डोंगरकडा : येथुन जवळच असलेल्या झुनझुनवाडी तांडा गावासाठी नव्याने डांबरीकरण व रस्त्यावर असलेल्या नाले पुलाचे काम सुरू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून गावाला रस्ता नसल्याने सुरू झालेले रस्त्याचे काम पाहुन गावकरी सुखावले होते. पण या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप गावकर्यांतुन होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन या रस्त्याचे काम सुरू आहे. अतिशय दुर्गम व माळरानात वसलेल्या झुनझुनवाडी तांड्यासाठी होऊ घातलेल्या डांबरीकरणामुळे भविष्यातील दळणवळणाची सोय सुखद होणार होती. पण प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यानंतर गुत्तेदाराकडुन निकृष्ठ दर्जाचे बांधकाम केले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत गावकर्यांनी अधिकार्यांना जाब विचारला असता अधिकारी गावकर्यांची दखल घेत नाहीत. रस्त्यामध्ये एकसमान रूंदी नाही तर काही ठिकाणी मध्येच रस्त्याचे काम बंद करून समोर नव्याने रस्ता सुरू करण्यात येतो. त्यामुळे याकडे राजकीय पदाधिकार्यांनी लक्ष घालुन कामाचा दर्जा सुधारण्याच्या सुचना देण्यात याव्यात अशी मागणी गावकर्यांतुन होत आहे.

No comments:
Post a Comment