चाकुरात भाजपचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष

Tuesday, May 29, 2018
चाकुर / प्रतिनिधी
चाकुर नगरपंचायतीमध्ये १७ पैकी भाजपचे केवळ ४ सदस्य अतसाना कॉंग्रेसच्या हातामुळे या नगर पंचायतीमध्ये भाजपच्या रूपाली सिद्धेश्‍वर पवार नगराध्यक्ष तर नितीन गुणाजी रेड्डी उपनगराध्यक्ष झाले.
    उपविभागीय महसूल अधिकारी प्रविण फुलारी यांच्या अध्यक्षतेत नगरसेवकांची बैठक झाली. नगर पंचायतमध्ये कॉंग्रेसचे पदाधिकारी होते. यावेळी मात्र भाजपने अपक्ष-२, सेना-२ यांना सोबत घेतले आणि कॉंग्रेसच्या एका महिला सदस्याने या दोन्ही पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या बाजुने हात वर करून मतदान केल्याने दोन्ही पदावर भाजपचेच पदाधिकारी निवडुन आले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला मात्र येथे पराभव स्विकारावा लागला. 

No comments:

Post a Comment