छत्रपती शिवाजी राजेंच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे ३ जूनला अनावरण

Tuesday, May 29, 2018
अहमदपुर / प्रतिनिधी 
येथील छत्रपती शिवाजी राजेंच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण ३ जून रोजी होणार असल्याची माहिती आ. विनायकराव पाटील यांनी दिली आहे. 
    ३ जून रोजी दुपारी ४ वाजता होणार्‍या या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती त्यांनी केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी राजे यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खा.छत्रपती संभाजी राजे भोसले उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून ना. पंकजाताई मुंडे, ना. संभाजीराव पाटील निलंगेकर, ना. रामजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती आ. विनायकराव पाटील यांनी केली आहे. या संपुर्ण सोहळ्यासाठी अहमदपुर, चाकुर विधानसभा मतदार संघातील जनता जनार्धनाबरोबरच परिसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशीही त्यांनी विनंती केली आहे.
    सर्वाचे सहकार्य सद्भावना व प्रेम यातुनच भुमिपुजन सोहळा व ३ जून रोजी अनावरण सोहळा संपन्न होत आहे. या महत्वपुर्ण घटनेचे हजारोंच्या संख्येेने आणि हा सोहळा यशस्वी करावा असही त्यांनी आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment