नांदेडला आंतरराष्ट्रीय सप्तरंग सांस्कृतीक महोत्सव

Tuesday, May 29, 2018
नांदेड/प्रतिनिधी - नांदेडकरांना विविध प्रकाराची संगीत व नृत्यांची सांस्कृतीक मेजवानी मिळावी म्हणून चार दिवसीय आंतरराष्ट्रीय सप्तरंग सांंस्कृतीक महोत्सवाचे आयोजन दि. २ ते ५ जून या दरम्यान कै शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात करण्यात आल्याची माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत जेठवाणी व अरिहंत चेरिट्रेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जैन यांनी दिली.
 शहरात २ ते ५ जून रोजी होत असलेले सप्तंरंग संस्कृतीक महोत्सवात देश विदेशातील नांमवंत कलाकार सहभागी होणार असुन स्पर्धेत भाग घेण्याबरोबर भारतातील वेगवेगळया प्रांतातील शास्त्रीय, लाकनृत्य व संगीत त्याचे सादरीकरण हे कलाकार करणार असल्याने नांदेड करासाठी ही मोठी प्रवणीच ठरणार आहे. अशी संधी निर्माण करून दिली. ती, संस्कृतीक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी सप्तरंग सेवाभावी संस्था, अरीहंत चेरिट्ेबल ट्रस्ट, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व निफा यांनी मिळवुन दिली.
सप्तरंग संस्कृतीक महोत्सवाची विभागणी दोन भागात करण्यात आली असुन सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपयर्ंंत स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तर दुसर्‍या भागात सायंकाळी ५.३० ते पुढे महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. २ जुन रोजी श्री संत बाबा बलविंदरसिंघजी कार-सेवा लंगर साहेब, नांदेड यांच्या हस्ते संध्याकाळी ५.३० वाजता महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणुन खा. अशोकराव चव्हाण, महापौर शिलाताइृ भवरे, आ. अमरनाथ राजूरकर, आ.डी.पी. सावंत, आ. हेमंत पाटील, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. अमिताताई चव्हाण, सॅम्पसन डेविड सह-सचिव भारतीय विद्यापीठे संघ दिल्ली, जिलहाधिकारी अरूण डोंगरे, कुलगुरू पंडीत विद्यासागर, उपमहापौर विनय गिरडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रदेशाध्यक्ष व्यापारी आघाडी भाजपा दिलीप कंदकुर्ते मा. अध्यक्ष चित्रपट सेन्सर बोर्ड पहेलाज निहलानी, राष्ट्रयश अध्यक्ष निफा, हरियाणा प्रीतपाल सिंघ पन्नु, अणध्यक्ष सहयोग फाउंडेशन डॉ. राम जवरानी, स्थायी समिती सभापती अब्दुल शमीम अब्दुल्ला, सभागृह नेता विेरेंद्रसिंघ गाडीवाले, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरत, जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, प्रशासकीय अधिकारी गुरूद्वारा तख्त बोर्ड स.डी.पी. सिंघ, अधिक्षक गुरूद्वारा तक्षत सचखंड बोर्ड, स. गुरविंदर सिंघ वाधवा यांची उपस्थिती या महोत्सवात राहणार आहेे. दुसर्‍यादिवशी दि. ३ जून २०१८ रविवार रोजी महाविर चौक येथुन सकाळी ८ वाजता शोीा यात्रा निघुन ती हनुमानपेठ कलामंदिर शिवाजीगर, महात्मा फुल पुतळ आयटीआय ते शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे समाप्त होणार आहे.

No comments:

Post a Comment