लातुरात पोलीस पाटलावर तलवारीने हल्ला

Friday, December 21, 2018
लातूर : खोपेगाव येथील पोलीस पाटलावर तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली असून या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील खोपेगाव येथील पोलीस पाटील दिनकर वामनराव सूर्यवंशी (वय ४४) हे घरात झोपले असताना गावातील बालाजी सुदाम पिटले याने घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करीत तलवारीने वार केले. यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले आहेत.


या संदर्भात पोलीस पाटील सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलिसांत कलम ३०७, ४५२ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश निलंगेकर हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकरणास अनैतिक संबंधाची झालर असून, याच रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे

No comments:

Post a Comment