सावधान!आरोग्यास घातक मासळी बाजारात विक्रीला?

Thursday, November 29, 2018
नांदेड/प्रतिनिधी- सध्या बाजारात मागुर मासळीला चांगली मागणी दिसुन येत आहे. मागुर जातीची मासळी ही पाण्याबाहेर ३ ते ४ तास राहु शकत असल्याने मच्छी मार्केटमध्ये ताजी मासळी म्हणुन ग्राहकांची पहिली पसंती असते.चवीला रुचकर असल्याने व जिवंत मासे मिळत असल्याने मत्स शौकीनांच्या अज्ञानाचा फायदा घेत भारत सरकार व राज्य सरकारने आरोग्यास घातक असल्याने प्रतिबंधीत केलेल्या या मासळीची विक्री मात्र जोरात होत असल्याचे दिसत आहे.


जिवंत मासळी बाजारात मिळत असल्याने व चवीला देखील रुचकर असल्याने अनवधानान मत्स शौकीन आपल्या घरी आरोग्यास घातक असलेले मासे खाल्ली जात आहेत. मुबलक प्रमाणात प्रोटीन्सचा साठा व मेद विरहित विटामिन सी व डी चे शरीरास पोषक तत्वे असल्याने मांसाहारी लोक चिकन व मटन ऐवजी मासळी मोठ्या आनंदाने आहारात घेतात. राज्यात मुख्यतः गोड्यापाण्यातील मासे बाजारात मिळतात त्यामध्ये रोही, कतला, मिरगळ व शिपर्णसचा समावेश होतो.

ही मासे सर्वत्र आठवडी बाजार व मच्छी मार्केटमध्ये मिळतात. या जातींचे मासे हे गोडया पाण्याच्या तलावात अथवा नदीमध्ये आढळतात. त्यांचे संवर्धनासाठी बिजोत्पादन व संवर्धनाकरीता शासन मोठया प्रमाणात प्रोत्साहन देते. हे मासे पाण्याबाहेर जास्त काळ जगु शकत नाहीत त्यामुळे त्यांची वाहतुक करण्यासाठी बर्फ अथवा शीतगृहाचा वापर करावा लागतो. तसेच हे मासे जास्त वेळ शीतगृहात देखील साठवता येत नाहीत व ते शीतगृहाबाहेर सडण्याची प्रक्रीया लवकर सुरु होते. त्यामुळे ताजे मासे ओळखणे सर्वसामान्य ग्राहकांना कळत नाहीत.

याउलट मागुर जातीची ज्याला कॅट फीश म्हणुन सुद्धा ओळखतात हे मागुर जातीचे मासे कोणत्याही घाण पाण्यात, डबक्यात वा घाण पाण्यात राहु शकतात. मागुर जातीची मासळी तलावातील वा डबक्यातले इतर छोटे मोठे जीवांची शिकार करीत जगतात. ही मत्स्याची प्रजात जेथे असेल

त्या तलावातील इतर जलचर व कोणतेही सडके मांस खावून जगु शकते. त्यामुळे या माशांमध्ये बॅकटेरियाचे प्रमाण आढळत असल्याने व जलाशयातील इतर जलचर, छोटे मासे व शंख- शिंपले यांची मोठया प्रमाणात शिकार करुन ती नष्ट करीत असल्याचे सिद्ध झाल्याने जैवविविधता धोक्यात येत असल्याने भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने या मांसाहारी मागुर जातीचे मासे संवर्धन व विक्रीवर प्रतिबंध केला आहे.

मागुर मासे चुकुन तलाव व नदीमध्ये सोडले गेल्यास सर्व प्रकारचे छोटे मासे व जीव खावून वेगाने प्रजनन करीत वाढतात व इतर जैवविविधतेला घातक ठरतात. त्यांच्या नियमित सेवनामुळे मळमळ, पोटाचे आजार व दुर्धेर कर्करोगाची लागण होऊ शकते. मत्स शौकीनांंच्या आरोग्यासाठी कॅटफीश म्हणजेच प्रतिबंधित मागुर मासे खाणे आरोग्यास घातक आहेत. 

जिवंत मासे मिळत असल्याने रुचकर चवीने ग्राहक भुलतात पण त्याचे भविष्यात गंभीर परीणाम भागावे लागु शकतात हे विसरु नये. अशाप्रकारचे मासे नांदेडच्या बाजारात मोठया प्रमाणात आयात मासे विक्री केले जात असुन त्याकडे कोणाचेही लक्ष नाही त्यावर आळा घालावा यासाठी मत्स्य विज्ञान शाखेचे पदवीधर सुनिल धुतराज यांनी जिल्हा प्रशासनाकडे आग्रंही मागणी करीत लढा उभारला आहे.

No comments:

Post a Comment