डॉक्टर पत्नीला औषधाच्या मुठभर गोळ्या चारुन जिवे मारण्याचा प्रयत्न !

Thursday, November 29, 2018
माहेरहून गाडी खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये व दवाखाना टाकण्यासाठी सात लाख रुपये, एक तोळ्याची सोन्याची अंगठी घेऊन ये असे म्हणून डॉक्टर पत्नीचा छळ करुन तिच्या तोंडात औषधाच्या मुठभर गोळ्या चारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चौंडी (ता.धारुर) येथे घडली. या प्रकरणी डॉक्टर पतीसह पाच जणाविरुद्ध धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धारुर तालुक्यातील चौंडी येथील डॉ.ज्योती राहूल मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पतीसह घरातील पाच जणांनी संगनमत करुन गाडी खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये आणि दवाखाना टाकण्यासाठी सात लाख रुपये व एक तोळ्याची सोन्याची अंगठी घेऊन ये म्हणून शारिरीक व मानसिक छळ करुन उपाशीपोटी ठेवून मारहाण केली. 

दि.२४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ठार मारण्याच्या उद्देशाने दोघांनी हात धरले व इतरांनी तोंडात औषधाच्या मुठभर गोळ्या चारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉ.राहुल श्रीकृष्ण मुंडे, सासरे श्रीकृष्ण व्यंकटी मुंडे, सासु जयश्री श्रीकृष्ण मुंडे, दिर रामलिंग श्रीकृष्ण मुंडे यांच्याविरुद्ध धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोना.जाधव हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment