प्रहार कार्यकर्त्यांच्या गनिमी काव्याने इसापूर धरणात उड्या

Monday, November 26, 2018

नांदेड/प्रतिनिधी- प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीन इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडावे ह्या मागणीसाठी इसापूर धरणात आंदोलन करण्याचा इशारा नांदेड तसेच यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिला होता. त्याच पाश्‍वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून धरण परिसरात पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त असतांना प्रहारच्या कार्यकत्यांना धरणक्षेत्रात रोखण्यात पोलीसांना यश आले देखील होते पण आज सकाळच्या थंडीचा आंदोलनकर्त्यांनी फायदा घेत पोलीसांची नजर चुकताच गनिमी कावा साधत ते धरणात उतरले.

मराठावाडाच्या वाटयाला नेहमीच निसर्गाने दुजाभाव केला आहे त्यात प्रशासनाने घातलेली मेख अधिकच भर घालत असल्याने प्रहार संंघटनेच्यावतीने पैनंगगा नदीपात्रात इसापूर धरणांचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी रेटून धरली पण त्यास कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच धरणात उतरून आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला आणि आज त्यास पुर्ततेची जोड दिली. 

इसापूर धरणावर प्रहारचे कार्यकर्ते उतरणार असल्याचे समजताच पोलीसांनी कडेकोटेे बंदोबस्त होता. गेल्या दोन दिवसापासून प्रहारच्या कार्यकर्त्यांना धरणापासून २ किमी अलिकडेच अडविण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवसापासून पोलीस डोळ्यात तेल घालून जागत होते. थंडीमुळे गाढ झोपलेल्या पोलीसांना चकमा देऊन गनिमी काव्याने आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी इसापूर धरणात उड्या मारल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली. उड्या मारणारे सर्वच प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन पूर्ण करून सुखरूप बाहेर पडल्यामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या प्रशासनाने सुटकेचे निश्वास सोडला आहे. 

या आंदोलनात महागाव येथील उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे, रियाज पारेख, पवन धरणकर,रानू कुरेशी, शेखर माहूरे, सागर डोंगरे, अक्षय भालेराव, अभिजीत कांबळे, निलेश खंदारे, माजिद शेख, विठ्ठल देशमुख, बालाजी बालपेलवाड, गजानन ठाकरे,अनिल पाटिल कदम, बालू पाटिल शिरपुले, गणेश कदम, सुभाष देशमुख हदगाव, यांच्यासह अनेक प्रहार कार्यकर्तै या शेतकरी हितार्थ अंदोलनात सहभागी झाले असून, आंदोलकांचे व्हिडीओ त्यानं सोशियल मिडयावरून व्हायरल केल्याने इसापूर धारणा जवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना प्रहारचे हे कार्यकर्ते धरणात पोचून आंदोलन करून बाहेर निघाले ते पोलिसांनाच माहीत नव्हते काय..? 

या ठिकाणी धरण परिसरात जाण्यास प्रतिबंध म्हणून कलम १४४ लागू नसल्याचे यावरून दिसून येत आहे. एकूणच आंदोलन सुरू असताना प्रशासनही किती बेफिकीर वागत असल्याचे दिसून आले आहे.

No comments:

Post a Comment