नागपूर : राममंदिराची निर्मिती करण्यासाठी न्यायालय जर निर्णय देत नसेल तर सरकारने कायदा करावा असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विविध संघटना आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित हुंकार सभेला संबोधित करतांना बोलत होते.
‘राम मंदिर निर्मितीसाठी कायदा व्हावा म्हणून सरकारवर दबाव आवश्यक आहे. मंदिराच्या निर्माणासाठी संपूर्ण समाज एकवटण्याचं काम आपल्याला करायचं आहे. यावेळी असा जोर लावूया की राम मंदिर निर्माणाचं काम झाल्यावरच जागरणाचं काम थांबवू. राम मंदिराच्या निर्माणानंतर सर्व भांडणं संपतील. त्यामुळे सरकारने आता लवकरात लवकर कायदा बनवण्याची आवश्यकता आहे. न्यायालय निर्णय देत नसेल तर सरकारने कायदा बनवावा’, अशी मागणी भागवत यांनी केली.
यावेळी बोलताना भागवत म्हणाले, ‘समाजाच्या भल्याचे जितके निर्णय आहेत, ते टाळण्याकडेच न्यायालयाचा कल असतो. राम मंदिराचा विषय हा न्यायालयाची प्राथमिकता आहे असं वाटतंच नाही. न्याय उशिरा मिळणं म्हणजेच तो नाकारला जाणं. म्हणूनच राम मंदिराचा विषय कोर्टात असला तरी त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या’, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले.

यासोबत, ‘जनहिताचे खटले न्यायालयात प्रलंबित कसे राहतात? रामजन्मभुमीवर इतर कोणी हक्क कसा सांगू शकतं?’ असा सवालही त्यांनी केला. हिंदू धर्म सहनशील आहे म्हणूनच मंदीर बनण्याला इतरा उशीर होत आहे. हिंदू धर्मीय श्रद्धाळू आणि सर्व धर्मांचा सन्मान करतात. हिंदू संविधानावर विश्वास ठेवतो, कायद्याने वागतो. समाज कायद्याने चालत नाही, प्रत्येक समाजाची एक संस्कृती चालीरिती असतात. प्रकरण न्यायालयात आहे, पण लवकर निर्णय घ्या असं मोहन भागवत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, श्रीराम श्रद्धेचा विषय आहे. राम मंदिराच्या निर्माणानंतर सर्व भांडणं संपतील त्यामुळे सरकारने आता लवकरात लवकर कायदा बनवण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण समाज एकवटण्याचं काम आपल्याला करायचं आहे.
यावेळी असा जोर लावूया की निर्माणाचं काम झाल्यावरच जागरणाचं काम थांबवू असं आवाहनही त्यांनी यावेळी स्वयंसेवकांना केलं. या हुंकार सभेला शंकराचार्य स्वामी, वासुदेवानंद सरस्वती महाराज, साध्वी ऋतुंभरा, जितेंद्रनाथ महाराज तसेच देशभरातील संत-महंत व आखाडा प्रमुखदेखील प्रामुख्याने उपस्थित आहेत.

No comments:
Post a Comment