देशाच्या न्यायव्यवस्थेला अशा प्रकारे राजकारणात खेचणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा एखादा न्यायाधीश अयोध्या प्रकरणासारख्या संवेदनशील खटल्यात देशाला न्याय देण्याच्या दिशेने सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊ इच्छितो तेव्हा काँग्रेसचे राज्य सभेतील वकील न्यायमूर्तींविरोधात महाभियोग आणण्याची धमकी देतात, असा आरोपही मोदी यांनी केला.
काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्या आईला शिव्या दिल्या आणि माझ्या जातीवरून प्रश्न उपस्थित केले तर मला त्याचे आश्चर्य वाटत नाही. हे बोलणारे कुणीही असले तरी त्यांच्याकडून हे वदवून घेणारा “नामदार” आहे अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली.

No comments:
Post a Comment