“जाणूया स्पर्शातला फरक" द्वारे साधला किशोरवयीन मुलींशी संवाद इनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईने “जाणूया स्पर्शातला फरक"उपक्रमांतर्गत किशोरवयीन युवतींना सखोल माहिती दिली.यावेळी स्ञि जन्माचा अभिमान बाळगा, शारिरीक,आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. स्पर्शातले बारकावे ओळखा असे आवाहन डॉ.शुभदा लोहिया यांनी केले.
येथील इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने शनिवार रोजी किशोरवयीन मुली व युवतींमध्ये जाणिव जागृती व्हावी यासाठी “जाणूया स्पर्शातला फरक" हा उपक्रम अंबाजोगाईतील जि.प.कन्या प्रशालेत राबविण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच.एल.कदम हे होते.तर प्रमुख वक्त्या म्हणून विचारमंचावर डॉ.शुभदा लोहिया,इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा सोनाली कर्नावट,सचिव सुहासिनी मोदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ.लोहिया म्हणाल्या की,निसर्गाने स्ञिला मातृत्व दिले आहे.काही संवेदना या वेगळ्या जन्मजात दिल्या आहेत. स्पर्श कसा झाला हे आपल्याला लगेच कळते. त्यामुळे वयात येताना काही आकर्षणापोटी आपले पाऊल चुकता कामा नये.कारण,स्ञि व मुलगी म्हणून आपली कसलीच फसवणूक नाही झाली पाहिजे.आपण जागृत राहीले पाहीजे. स्पर्शातले बारकावे याकडे लक्ष दिले पाहीजे.दिल्लीतल्या निर्भयासारखे प्रसंग कोणत्याच स्ञि,मुलीवर येवू नयेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रसंगाची शक्यता असते.त्यामुळे निर्भिड बना. आहारी जावू नका.अमिषाला बळी पडू नका.असे आवाहन करून “जाणूया स्पर्शातला फरक" या विषयांवर डॉ.शुभदा लोहिया यांनी मौलिक व विस्तृत असे मार्गदर्शन केले.अध्यक्षिय समारोप मुख्याध्यापक एच.एल. कदम यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सोनाली कर्नावट यांनी करून सुञसंचालन सौ.मिना डागा यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार सचिव सुहासिनी मोदी यांनी मानले.सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इनरव्हील क्लब अंबाजोगाईच्या अध्यक्षा सोनाली कर्नावट,सचिव सुहासिनी मोदी,मीना डागा,गिता परदेशी,डॉ.अश्विनी भुसारे, रंजना दराडे,मनिषा बडेरा,दिपाली चोकडा,दिपा धुत,अंजली चरखा, शिवकन्या साळुंके,सुरेखा सिरसट,सुवर्णा बुरांडे, वैजयंती टाकळकर,पञकार किरण देशमुख आसरडोहकर,सौ.देशमुख,एस.एन कुलकर्णी,सुकन्या कुलकर्णी,महाजन मॅडम यांनी पुढाकार घेतला.यावेळी शिक्षक,शिक्षीका व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment