नांदेड जिल्ह्यात बारा तालुक्यात अतिवृष्टी

Tuesday, August 21, 2018



नांदेड/प्रतिनिधी-मागिल आठ दिवसापासुन सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला आहे.दरम्यान सोमवारी जिल्ह्यात सर्वदुर पाऊस झाला.एकुण 80.35 मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली.पावसाने बारा तालुक्यात अतिवृष्टी झाली असुन उर्वरीत तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे. 

श्रावण सुरु झाल्यापासुन जिल्ह्यात सतत पाऊस सुरु आहे.सोळापैकी बारा तालुक्यात तसेच साठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.विष्णुपुरी धरण फुल्ल भरल्यामुळे धरणाचे पाच दरवाजे सोमवारी रात्री बारा वाजता उघडण्यात आले होते.ओढे व नाल्याला पाणी आल्यामुळे दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यु झाला आहे.

नांदेड,मुदखेड,अर्धापुर,भोकर,उमरी,कंधार,लोहा,हदगाव,हिमायतनगर,बिलोली,धर्माबाद व नायगाव या बारा तालुक्यात अतिवृष्टी झाली.किनवट,माहुर ,देगलुर व मुखेड या तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे.

अतिवृष्टी झालेल्या मंडळामध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.दरम्यान मंगळवारी सुर्यदर्शन झाले असुन दुपारी दोन वाजेपर्यंत पाऊस नव्हता.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment