खेड जि. रत्नागिरी दि. 11 --- ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले , त्या शिवसेनेने कोकणी माणसाला काय दिले ? शिवसेनेचा केंद्रात उद्योग मंत्री असताना कोकणात एकही प्रकल्प आला नाही. राज्यात त्यांच्याच उद्योग मंत्री असतांना त्यांचे काय उद्योग सुरू आहे तर फक्त भूसंपादनातून शेतक-यांची अडवणूक आणि लूट सुरू असल्याचा घणाघाती हल्ला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
शिवसेनेने कोकणाला काय दिले ? यांच्या दोन्ही उद्योग मंत्र्यांचे उद्योग काय ?
परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या दिवशी खेड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.निवडणुकांच्या तोंडावर या सरकारला वाटतंय की जीएसटीत बदल करावा, दहा टक्के आरक्षण द्यावं. मोदींनी एवढा अभ्यास केला तरी कधी? असा सवाल केला.२०१४ मध्ये ५० रूपयाला मिळणाऱ्या पेट्रॉलने ८० रूपयांचा टप्पा पार केला. तुम्हीच हिशोब लावा. गॅसचे भाव 2014 ला किती होते आणि आता केव्हढयाला मिळतो याचा विचार करा मग सरकारकडून झालेली लूट लक्षात येईल असे म्हणत महागाईच्या मुद्दाकडे लक्ष वेधले.
आमच्या मराठवाड्यात पैशांना दाम म्हणतात. असं ऐकलंय की, शिवसेनेच्या मंत्र्याचे सुपूत्र निवडणूकीला उभे राहतायत. ते कामाच्या जोरावर नाही तर दामाच्या जोरावर. तुम्ही भले त्यांना ‘राम’ म्हणत असाल. मात्र आम्ही त्यांना ‘दाम’दास म्हणतो असे म्हणत मंत्री रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला.यावेळी विधीमंडळ पक्षनेते मा. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी मंत्री भास्कर जाधव , आमदार संजय कदम, सौ. चित्राताई वाघ, आ. प्रकाश गजभिये, आ. विद्याताई चव्हाण, अजिंक्य राणा आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment