आलोक वर्मांचा थेट राजीनामाच !

Saturday, January 12, 2019


नवी दिल्ली : सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी अखेर राजीनामा दिलाय. त्यांच्या निवृत्तीला फक्त 19 दिवस बाकी आहेत. याअगोदरच त्यांनी राजीनामा दिला. अग्निशमन विभागाचे संचालक म्हणून त्यांची बदली करण्यात आली होती. पण त्यांनी नवा पदभार स्वीकारण्यास नकार दिला आणि राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
सीबीआयमधील एक नंबर आणि दोन नंबरच्या पदावरुन जो वाद सुरु झाला, त्यानंतर आलोक वर्मांना सुट्टीवर पाठवण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाकडून हा सुट्टीचा निर्णय रद्द करण्यात आला आणि आलोक वर्मांनी पुन्हा सीबीआय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.

दिल्ली स्पेशल पोलीस कायद्यानुसार सीबीआय संचालकाची नियुक्ती पंतप्रधान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेता यांची समिती करते. याच समितीने आलोक वर्मा यांच्याबाबद अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. अखेर या समितीने गुरुवारी आलोक वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता.

No comments:

Post a Comment