सेनगावात पंचायत समितीचा गोडाऊन जाळला पांगरा शिंदे येथे रेल्वे रूळ उखडल्याची अफवा

Thursday, August 9, 2018



हिंगोली / प्रतिनिधी  
जिल्हाभरात आज 9 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ करून आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला. तर सेनगावात कालपासून एक स्कूल व्हॅन, दुपारी एकच्या दरम्यान रस्त्याच्या कामाला असलेली बोलेरो गाडी व साडेतीनच्या सुमारास पंचायत समितीच्या गोडाऊनला आग लावल्याची घटना घडली आहे. तसेच वसमत तालुक्यातील शिंदे पांगराजवळ काही अज्ञात आंदोलकांनी रेल्वे रूळ उघडल्याने रेल्वे वाहतुकही विस्कळीत झाली आहे अशी आफवा पसरवण्यात आली होती, पण असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या बंदला या वेगवेगळ्या घटनांमुळे हिंसक स्वरूप आले आहे.




 सेनगाव पंचायत समितीचे गोडाऊन जाळलेले प्रकरण व पांगरा शिंदे येथे रेल्वे रोकोमुळे आंदोलन हिंसक झाल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वे विभागाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक थांबविली आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तणाव पूर्ण शांतता आहे. दरम्यान, आंदोलकांनी हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या चारचाकी वाहनांसाठी रस्ता मोकळा करून देत धार्मिक एकोपा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

No comments:

Post a Comment