लातूर प्रतिनिधी:
आरक्षण, शैक्षणिक सवलती आणि इतर कांही मागण्यांसाठी महाराष्ट्रातील मराठा समाज कोटीच्या संख्येने आज रस्त्यावर उतारला आहे. समाजाच्या भावनांचा सन्मान आणि आदर राखून आपणही आज चक्काजाम आंदोलनात सहभागी झालो असून समाजाच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आपण याचा पाठपूरवा करणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार (दि.९) ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमिवर मराठा समाज व मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर विविध समाज संघटनांच्या वतीने लातूर-औसा रोड वरील वासनगाव फाटा येथे आयोजित चक्काजाम आंदोलनात सहभागी झाल्यानंतर आमदार देशमुख बोलत होते. या आंदोलनाचे वैशिष्टय म्हणजे आंदोलनात सर्व जाती धर्माच्या लोकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. चक्काजाम आंदोलना दरम्यान साधारणत: पाच सहा रूग्णवाहिका रस्त्याने जात असताना आपल्या आरक्षण व इतर मागण्यासाठी आग्रही असालेल्या मराठा समाजातील आंदोलकांनी या सर्व रुग्णवाहिका व परिक्षार्थींना आंदोलना दरम्यान रस्ता करुन दिला.
शासनाच्या भूमिकेबाबत साशंकता
या प्रसंगी पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, मराठा समजाने मागच्या वर्षभरात शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले, इतरही विविध आंदोलने केली. सनदशीर मार्गाने झालेल्या या आंदोलनाची दखल जागतीक पातळीवर घेतली गेली. महाराष्ट्र सरकारने मात्र या आंदोलनाची अपेक्षीत दखल घेतली नाही. वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे सरकारच्या एकूण भूमिकेबाबतच आता या समाजात शाशंकता निर्माण झालेली आहे.
किंमत मोजावी लागेल
चार वर्षापूर्वी राज्यात सत्तारुढ झालेल्या राजकीय पक्षाच्या लोकांनी निवडणूकीपूर्वी मराठा व इतर समाजालाही अनेक आश्वासने दिली परंतू सत्ताधारी बनल्यानंतर याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. परिणामी या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आगामी काळातही राज्यकर्त्यांचा कारभार असाच पुढे चालू राहिला तर शासनाला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
मराठा समाजाच्या आारक्षण, शैक्षणिक सवलती, महिलांसाठी सुरक्षा आणि शेतीमालाला योग्य भाव या सारख्या रास्त मागण्या आहेत. त्या त्वरीत मंजूर कराव्यात म्हणून आज संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठबळ देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत शासन, प्रशासन स्तरावर आणि विधीमंडळात सातत्याने पाठपूरावा करीत राहणार आहे, असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी लातूर – औसारोड वासनगाव फाटा येथे करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनात माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य धिरज विलासराव देशमुख यांच्यासह माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. व्यंक्ट बेद्रे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माईज शेख, विक्रम हिप्परकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, बाळासाहेब जाधव यांच्यासह वासनगाव व परिसरातील नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment