छत्रपती शिवरायाच्या चरणी पालकमंत्री निलंगेकरांनी स्विकारले आंदोलकांचे निवेदन

Thursday, August 9, 2018


 
निलंगा/ प्रतिनिधी ः क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन राज्यभर करण्यात आले निलंग्यातही सदर आंदोलन करण्यात आले असून सकाळपासून शहरातील व्यापारी प्रतिष्टाने कडकडीत बंद होती. या आंदोललनामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे नेते  हजेरी लावत असताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट आंदोलकांना समोरे जावून छत्रपती शिवरायाच्या चरणी मराठा समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन  स्विकारली. आंदोलकांशी चर्चा करताना  पालकमंत्री निलंगेकरांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबंध्द असल्याचे सांगून या आंदोलनास पालकमंत्री म्हणून नव्हे तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून माझा पाठींबा असल्याचे स्पष्ट केले.

निलंगा शहरातील शिवाजी चौकात सकाळपासून विविध राजकीय पक्षानसह मराठा समाजातील कार्यकर्त्यानी ठिय्या करत चक्का जाम आंदोलन केले होते. या दरम्यान आंदोलकांतील कांही जणांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना निवेदन देण्यासाठी त्यांचे निवासस्थान गाठले. मात्र पालकमंत्री निलंगेकरांनी आंदोलकांना आपण शिवाजी चौकात जावून छत्रपती शिवरायांच्या साक्षीने निवेदन घेऊ असे सांगितले. त्यानंतर पालकमंत्री निलंगेकर यांनी शिवाजी चौकात चालू असलेल्या चक्का जाम आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी प्रथम छत्रपती शिवरायांच्या अश्वारुड पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलकांचे निवेदन स्विकारले. त्यानंतर त्यांनी आंदोलकांशी संवाद साधताना मी या ठिकाणी पालकमंत्री म्हणून नव्हे तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून सर्वाना आश्‍वस्त करतो की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबंध्द आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोव्हेबंर अखेर पर्यत समाजास आरक्षण मिळेल असे सांगितले असून त्यासाठी शासन बांधील असल्याची ग्वाही दिली.

 आंदोलकांनी शांतमय मार्गाने आंदोलन करावे कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये असे आवाहन पालकमंत्री निलंगेकर यांनी केले. ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या प्रश्‍नाची मला जान असून 25 एकर मालकीचा शेतकरी सध्या भूमिहीनच असल्या सारखी परस्थिती आहे. त्यामूळे समाजाच्या हितासाठी समाजाचा प्रतिनिधी म्हणून  खारीका वाटा उचलण्या इतपत उपयोगी पडलो तर ते मी माझे भाग्य समजतो. तसेच आपण दिलेल्या निवेदनाचे कटिबंध्दतेने पालन करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी शिवरायाच्या साक्षीने आंदोलकांला सांगितले.   


 
 पालकमंत्री निलंगेकर आंदोलनस्थळी येण्यापुर्वी सुरु असलेल्या चक्का जाम आंदोलनात एम.एम.जाधव.,डॉ.लालासाहेब देशमुख, अरुण सांळुके, एस.एम. शिंदे, अरविंद पाटील निलंगेकर, जि.प.चे कृषि सभापती बजरंग जाधव,शंकर मोरे, किशोर पाटील, शाहुराज मोरे, सुरेश चांदुरे, विनोद उमाटे, विलास पाटील,अभय सांळूके, अशोbक पाटील निलंगेकर, प्रा, व्ही. एल. एरंडे, आदीसह तालुक्यातील समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment