निलंगा दि सत्यजीत बद्दर
लातूर चे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निलंगा येथील आंदोलनात सहभाग नोंदविला या वेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट शब्दात आपली भूमिका आंदोलकांसमोर मांडली आपना सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांच्या चरणी उभा ठाकून एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे मी ठाम असल्याचे ते म्हणाले मी स्वतः सरकार मध्ये काम करत असलो तरी मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी जाहिर केले .
आपले सरकार मराठा समाजाला निश्चितआरक्षण देणार आहे त्या साठी सरकार तर्फे नोहेंबर ची डेडलाईन देण्यात आली आहे असे बोलून उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले आपला जीव लाख मोलाचा आहे तेव्हा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलूनका ग्रामीण भागाच्या वेदना मी माझ्या डोळ्यांनी पहिल्या आहेत ग्रामीण भागातील शेतकरी भूमिहीन झाला आहे सरकार मध्ये काम करत असताना उपेक्षित घटकासाठी खारीचा वाटा मी उचलत असल्याने ते माझे भाग्य समजतो असे हि ते म्हणाले
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment