तेलंगणात भीषण अपघात ४५ ठार

Tuesday, September 11, 2018

जगतियाल : मंगळवारी जगतियाल जिल्ह्यातील कोंडागट्टू घाट रस्तावर टीएसआरटीसी बस कोसळून झालेल्या अपघातात अनेक महिला व लहान मुलांसह 4५ जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जगतियालमधील कोंडागट्टू घाटात ही दुर्घटना घडली आहे. 

अपघातावेळी तेलंगणा राज्य रस्ते परिवहन मंडळ (टीएसआरटीसी) च्या बसमध्ये एकूण 62 जण प्रवास करत होते. ही बस कोंडागट्टूच्या हनुमान मंदिरावरुन जगतियाल जात होती. रस्त्यावर उतार होता. या रस्त्यावर वळण घेताना बसचा ब्रेक फेल झाला आणि बस दरीत कोसळली. दरीत कोसळण्याआधी बस आधी चार वेळा पलटली होती. तेलंगणा राज्य रस्ते परिवहन वाहतूक महामंडळ (TSRTC) च्या बसला आज सकाळी अपघात झाला. या बसमध्ये ६३ प्रवासी होते. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. 

जगतियालचे जिल्हाधिकारी ए. शरथ, एसपी सिंधु शर्मा आणि करीमनगरचे पोलिस आयुक्त कमलहासन रेड्डी आणि अन्य अधिकारी घटनास्थळी धावले आणि 40 पेक्षा अधिक जखमींना जगतायलच्या सरकारी दवाखान्यात हलविले आहे 

 दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तीव्र दु: ख व्यक्त केले.  संदेशात, मुख्यमंत्र्यांनी  मृत कुटुंबियांचे  सांत्वन केले. त्यांनी जखमींना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी संबंधित अधिकार्यांना आदेश  केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत  जाहीर केली आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment