लातूर / प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी काल गोदावरी नदीत उडी मारून काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतली. या घटनेवरून महाराष्ट्र सरकारचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला लातूर शहर आणि जिल्ह्यात 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
शहरातील सर्व व्यापारी, प्रतिष्ठाणे कडेकोट बंद ठेवण्यात आली होती. मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने बंदचे आवाहन करीत दुचाकीवरून फिरत होते. सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून रात्री 12 नंतर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली. शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. मार्केट यार्डात ही सौदा निघाला नाही. परिणामी सारे व्यवहार ठप्प झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.गंजगोलाई, आदर्श कॉलनी, अंबाजोगाई रोड, शिवाजी चौक, आदर्श कॉलनी परिसरात औषध दुकाने वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.
छायाचित्र श्याम भट्टड |
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काल म्हणजेच सोमवारी (२३जुलै) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र केलं आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत.
आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान मंगळवारी (24 जुलै) सकाळी शिवाजी चौक येथे एका आंदोलकानं अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. दरम्यान, शहर व जिल्ह्यात सर्वत्र बंद आंदोलन शांततेत सुरू असताना शिवाजी चौकात घडलेल्या घटनेमुळे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या आंदोलकाला ताब्यात घेतल्यानंतर मराठा समाजाच्या अन्य कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment