maratha arakshan Live नांदेडात एसपीच्या गाडीवर दगडफेक

Tuesday, July 24, 2018

 बंदला उत्सफुर्त प्रतिसाद शाळेला सुट्टी-बसची चाके थांबली 

नांदेड/प्रतिनिधी- 
शहरातील राज कॉर्नर या ठिकाणी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या  गाडीवर आंदोलकांनी दगडफेक केली त्या नंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला यात शिवशेनेचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील १ पोलीस कर्मचारी आणि २ आंदोलन कर्ते जखमी झाले बंदला हिंसक वळण मिळत असल्याने राज कॉर्नर ते भाग्य नगर परिसरात तणावाचे वातावरण आहे

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास राज्य शासन उशीर करीत असल्याने औरंगाबादच्या युवकाने जलसमाधी घेतली. या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील शाळा व्यवस्थापनांनी सकाळी प्रार्थना घेऊन विद्यार्थ्याना घरी पाठविले तर मध्यवर्ती बसस्थानकातुन आज सकाळपासून बाहेर जाणार्‍या सर्व बसेस सायंकाळपर्यत रद्द करण्यात आल्या. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या हनुमानपेठ-वजिराबादच्या व्यापार्‍यांनी बंदला साथ देत आपली दुकाने बंद ठेवली होती. शिवाजीनगर, भाग्यनगर, आनंदनगर, सिडको -हडकोसह नवामोढत्त व जुना मोंढा येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.

 सर्वत्र दैनंदीन जीवनावश्यक गरजेच्या वस्तुंची दुकाने दुध- भाजीपाल्याची दुकाने तुरळक प्रमाणात सुरु होती. काही कीरकोळ व्यापार्‍यांनी अर्धे शटर चालु ठेवून आपले व्यवहार केले. दुपारपर्यत सार्वजनिक वाहतुक पुर्णपणे बंद असल्याने व जवळपास अ‍ॅटोचालकांनी देखील बंदला प्रतिसाद दिल्याने रस्त्यांवर तुरळक वाहतुक दिसत होती. शहरातील मुख्य चौकांमध्ये कोणतीही अप्रिया घटना घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. 


शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळी मराठा समाजाच्या युवकांनी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे याचा जयघोष करीत श्रद्धांजली वाहिली. एकंदरीत नांदेड येथे महाराष्ट्र बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर



No comments:

Post a Comment