शिवसेनेने केले गनिमीकावा पद्धतीने येथे रास्ता रोको

Wednesday, July 25, 2018


नांदेड दि मराठवाडा नेता ऑनलाईन 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काल पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या गाडीसह २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली त्या नंतर अचानक दगडफेक झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत जमाव पागवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये शिवसेनेचै जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांच्या सह अनेकांना जबरदस्त मारबसला त्या घटनेचे पडसाद बुधवारी नांदेड मध्ये उमटले शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील ,आ नागेश पाटील आष्टीकर , आ सुभाष साबणे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी रास्तारोको आंदोलन सुरु केले आहे . शिवसेनेने अचानक केलेल्या या आंदोलनामुळे शिवाजी नगर दादरा या ठिकाणी वाहतुकीची कोडी झाली आहे 


पोलिसांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना केलेल्या मारहाणीचा निषेध विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत नोंदवण्यात आला त्या नंतर तिन्ही आमदाराच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी शिवाजी नगर दादऱ्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले या वेळी पोलीस अधीक्षकांचा निषेध करण्यात आला या वेळी दुसरे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम यांच्या सह शिवसेनेचे पधादिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले आहेत . 

आंदोलन संपल्यानंतर आमदाराच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत आणि जिल्हा प्रमुख भुजंग पाटील यांना झालेल्या मारहाणीसंदर्भात मागण्याचे निवेदन त्यांना देण्यात येणार आहे
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर



No comments:

Post a Comment