हनुमान मंदिराची दानपेटी फोडल्यानंतर जवळच असलेल्या खंडोबा मंदिर येथील कुलूप तोडून पूर्ण पेटी मधील अंदाजे दोन ते तीन हजार घेऊन चोरट्याने पोबारा केला तर त्यानंतर पुढे असलेल्या महादेव मंदिराची दानपेटी चे कुलूप तोडून पेटीतील चिल्लर ठेवून नोटा घेऊन चोरटे पसार झाले.जांब बु येथील जनतेमध्ये अशा घटनेने घबराहट निर्माण झाली असून चोरट्यांनी एका दिवसात तीन मंदिराची दानपेटी फोडून चोरी केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
सध्या जांब बुद्रुक पोलीस ठाणे येथे या घटनेचा तपास चालू असून अद्याप पर्यंत पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नव्हता या घटनेची गंभीर दखल घेऊन चोरट्यांना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी जनतेतून होत आहे तसेच हनुमान मंदिरातील दानपेटी चोरीची माहिती श्रीराम मोरे व शिवलिंग कदराळे व खंडोबा मंदिराची माहिती कोंडीबा सूर्यवंशी तर महादेव मंदिराची माहिती शिवाजी गोंड यांनी दिली.

No comments:
Post a Comment