गेल्या १९ तारखेपासून विदर्भ - मराठवड्याच्या सीमेवरून वाहणार्या पैनगंगा नदीच्या पात्रात शेकडो शेतकरी महिला - पुरुषांनी इसापूर धरणातून पाणी पैनंगंगा नदीपात्रात सोडण्यात यावे म्हणून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
याबाबत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांच्या मध्यमातून शेतकर्यांचे शिष्टमंडळ मुंबईमध्ये जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर लगेचच सायंकाळी आ. हेमंत पाटील यांनी शेतकर्यांंचे प्रश्न मांडून पैनगंगेत बसलेल्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करून पाणी सोडण्यात यावे अशा विनंती केली.
आ. राजेंद्र नजरधने यांनी देखील विधानसभा सभागृहात उमरखेड महागाव दोन्ही तालुके दुष्काळी असून, विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीपात्रात बसलेल्या शेतकर्यांसाठी इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात १५ दलघमी पाणी सोडण्याची विनंती शासनाला केली.
दुष्काळ परिस्थितीत नदीकाठच्या गावांना आधार देण्याची विनंती केल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे उमरखेड- हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचा आशावाद दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment