रब्बी पिकविमा शेतक-यांना लवकरच मिळणार : पालकमंत्री निलंगेकर

Tuesday, February 12, 2019
मुंबई दि.12
चाकुर तालुक्यातील रब्बी पिकविम्या पासून वंचित शेतक-यांना लवकरच पिकविमा मिळेल असा विश्वास पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.आज मुंबई येथे मंत्रालयात पालकमंत्री ना संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली व मतदार संघाचे आमदार विनायकराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधीत अधिका-या समवेत बैठक संपन्न झाली.



या बैठकीसाठी कृषि सचिव,कृषि आयुक्त एस राजगोपालन,विभागीय व्यवस्थापक इन्शुरन्स कंपनी व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना आमदार विनायकराव पाटील म्हणाले की,रब्बी पिकविमा वाटपात चाकूर तालुक्यातील शेतक-यांवर जाणीव पूर्वक अन्याय झाला आहे.ही बाब वेळी वेळी संबंधीत यंत्रणेला सांगीतली शेवटी नाविलाजाने मला आमरण उपोषण करावे लागले. या वेळी पालकमंत्री ना संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या प्रकरणी तातडीने बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केले होते. ठरल्या प्रमाणे मंत्रालयात बैठक होत असून या बैठकीतून सकारात्मक निर्णय घेण्याचे अवाहन केले.

यावेळी पालकमंत्री ना संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी महसुल कृषी,ग्रामविकास विभागाने केलेल्या पिककापणी प्रयोगाची तात्काळ पुर्नतपासणी करुन शेतकऱ्यांना विमा देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करावा असे आदेश दिले.

या मूळे लवकरच अहमदपुर मतदारसंघातील पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 आमच्या बातम्या आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

No comments:

Post a Comment