चाकुर तालुक्यात संशयास्पद मृत्यू.

Tuesday, February 12, 2019

गणेश स्वामी 
चाकूर ः तालुक्यातील कलकोटी (ता.चाकूर) येथील एक तरूणाचा घरात संशयास्पदरित्या मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (ता. १२) घडली आहे. कलकोटी येथे सुर्यकांत मदनुरे हे पत्नी व दोन तरूण मुलासह राहतात, दोघें पती - पत्नी रविवारी (ता.११) नातेवाईकाच्या विवाहासाठी बाहेरगावी गेले होते. मंगळवारी सकाळी घरी आले असता मुलगा लिंगराम सुर्यकांत मदनुरे (वय २८) याचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आला.
याची माहिती पोलिसांना दिल्यावरून पोलिस उपनिरीक्षक सुरेश भोसले, अभंग माने, पोलिस हवालदार जीवन राजगीरवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सायंकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पोलिस उपनिरीक्षक अंभग माने पुढील तपास करीत आहेत.

आमच्या बातम्या आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

No comments:

Post a Comment