वसमत / प्रतिनिधी
दररोज दारू पिऊन त्रास देतो या कारणावरून सख्या भावाचा दोघा भावानीच धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना वसमत शहरातील राधाराम टॉकीज जवळ बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वसमत येथील कार्तिक शिंदे वय 30 वर्ष याचा बुधवार दिनांक 5 डिसेंबर रोजी कौठा रोड वरील राधाराम टॉकीज जवळ सख्खे भाऊ कैलास शिंदे, विलास शिंदे व इतर तिघानी दररोज दारू पिऊन का त्रास देतो या कारणावरून धारदार शस्त्राने वार केले या मध्ये कार्तिक शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्रसिंग धुन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रूपाली कांबळे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून प्रेत उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे नेण्यात आले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment