अहमदपूर
मतदारसंघाचा चौफेर विकास व्हावा या साठी मी प्रयत्नशिल असून मतदारसंघातील दोनशे पंधरा किमी लांबीचे रस्ते विविध योजनेच्या माध्यमातून मंजूर केले असून लवकरच याचा शुभारंभ करणार असल्याचे आमदार विनायकराव पाटील यांनी केले.
चापोली येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी नारायणराव चाटे हे होते तर प्रमूख पाहूणे म्हणून सभापती सुनिता डावरे, जिप सदस्या अरूणाताई कांबळे,शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सूभाषदादा काटे,कृउबास सभापती प्रशांत पाटील, उपसभापती वसंतराव डिगोळे,पंस सदस्य सज्जन लोनावळे, तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे,चाकूर अध्यक्ष मेघराज बाहेती,अशोकदादा चिंते, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड अमित रेड्डी,बालाजीदादा सूर्यवंशी,जिल्हानियोजन समीती सदस्य शेळकेदादा,अभिमन्यू पवार,सिध्दाजी माने,लक्ष्मण पेटकर,अशोक नागीमे,प्रभाकर होनराव,नंदकुमार पाटील,उमाकांत कासनाळे,विष्णूअण्णा सावंत,फारूख शेख,मलकू मलीशे,संग्राम स्वामी, यूवकनेते डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
पूढे बोलताना आमदार विनायकराव पाटील म्हणाले की, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून मी कामाला सुरूवात केली आहे.जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे ही ब्रीद घेवून काम करतोय.आज शासनाच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून मतदार संघाचा समन्यायी विकास हेच आपले ध्यैय असल्याचे सांगीतले. या वेळी वसंतराव डीगोळे,सूभाषराव काटे,सज्जन लोनावळे आदींचे समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश मद्रेवार यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येन नागरीकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment