अहमदपूर
विधानसभा मतदार संघातील ग्रामविकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील MVSTF "महाराष्ट्र व्हिलेज सोशियल ट्रान्सफार्मेशन फाऊंडेशन" अर्थात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन च्या वतीने मतदार संघातील दहा गावांचा समावेश करण्यात आला असून विकास कामासाठी ही गांवे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असल्याची माहिती आ.विनायकराव पाटील यांनी दिली आहे.
प्रामुख्याने ग्राम पातळीवर गावांचे सूक्ष्म नियोजन करणे,गावातील बलस्थाने शोधून शाश्वत विकासासाठी या बलस्थानाचा विकास करणे,पर्यावरण पूरक उपक्रम राबविने,गावाचा सर्वांगीण विकास साधने,विकासाचे एक नवे माॅडेल म्हणून गावाचा विकास साधने,शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविने अशा कितीतरी उद्देशातून लोकसहभागातून गावांचा विकास करण्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी राज्यातील एकहजार गावे दत्तक घेवून या गावांना आदर्शग्राम संककल्पनेप्रमाणे विकसीत करण्यात येणार आहेत.
एकट्या अहमदपूर विधानसभा मतदार संघातून धसवाडी,लेंडेगांव,नांदूरा(खु.),येस्तार,सोरा,तेलगांव ता.अहमदपूर बेलगांव,अंबूलगा,हाळी(खू),कडमूळी ता.चाकूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही गांवे स्वतः मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यामुळे गावांचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास आ. विनायकराव पाटील यांनी व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment