मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार म्हणजे एक अरिष्ट् असल्याची भावना राज्यातील आणि देशातील जनतेमध्ये तयार झाली आहे. या लोकभावनेचा आदर करून हे सरकार चालविण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावयास हवे, असा सूर मंगळवारी सायंकाळी मुंबई येथे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून आयोजित महाआघाडी संवादातून पुढे आला.
या संवादात सहभागी होताना राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यात व देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे बदलायला हवीत अशी लोकांची इच्छा आहे त्यामुळे समर्थ पर्याय निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. राज्यात 1999 पासून समविचारी पक्षांची आघाडी आहे ती अधिक भक्कम करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष खा.राहूल गांधी, राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार सक्रिय झाले आहेत. त्यांचा आदेश आपण सर्वांना मान्यच राहणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर समविचारी पक्षांचे लोकप्रतिनिधी व प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा घडून यावी यादृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेवून मंगळवारी सायंकाळी चर्चगेट येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात महाआघाडी संवादाचे आयोजन केले होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण, माजी उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे आ.जयंत पाटील, रिपब्लिक पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे, लोकभारतीचे कपिल पाटील, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यासह समविचारी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
आघाडीची चर्चा गावपातळीपर्यंत हवी- अशोक चव्हाण
राज्यात व देशात आकार घेत असलेली ही समविचारी पक्षाची आघाडी केवळ नेत्यांपर्यतच मर्यादित न राहता ती जिल्हा आणि गाव पातळीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे त्यादृष्टीने आ.अमित विलासराव देशमुख यांनी आज जो नेत्यांमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न त्याप्रमाणे जिल्हा आणि स्थानिक पातळीवर आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
परिवर्तनाचे वातावरण- पृथ्वीराज चव्हाण
देशातील राजकारणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न सध्या घडत आहे. या संक्रमणाच्या काळात सर्व पुरोगामी विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. अशी प्रक्रिया सुरु झाल्याने देशात अनुकूल वातावरण आहे. या वातावरणाचा फायदा घेत सत्तांतर घडवावे ही आपली जबाबदारी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
झाले गेले एकत्र येवू – अजित पवार
राज्यात आघाडीमध्ये चांगला समन्वय ठेवून सरकार चालविण्याची माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चांगला पायंडा पाडलेला आहे. त्या मार्गावरुन आपण सर्वजण पुढे गेलो तर सत्तांतर घडविणे अवघड नाही असे माझे मत आहे. झाले गेले गंगेला मिळाले असा विचार करुन आपण आज पुढे जाऊया. देशमुख परिवाराने आयोजित केलेल्या या संवाद कार्यक्रमाने आघाडी मजबुतीच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे. आगामी काळात महाआघाडी महाशक्ती म्हणून पुढे येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अशा बैठका वारंवार हव्यात – राधाकृष्ण विखे-पाटील
भाजपचे सरकार हे राज्य आणि देशावरचे संकट आहे हे आज सर्वांना कळून चुकले आहे ते दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे अनिवार्य बनले आहे. त्यासाठी अशा बैठका वारंवार व्हावयास हव्यात असे मत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
देशमुखांचे पाऊल स्वागतार्ह – धनंजय मुंडे
महाआघाडी संवादाच्या निमित्ताने आज प्रमुख राजकीय नेत्यांचे स्नेहमिलन घडले आहे. ही प्रक्रिया निरंतर पुढे चालतू राहिल आणि राज्यात आणि देशात सत्तांतर घडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आमदार अमित देशमुख यांचे पहिले पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
आघाडीत येण्यास तयार – अबु आझमी
देशातील जातीयवादी सरकार गाडून टाकण्यासाठी समाजवादी पार्टीने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे स्पष्ट आदेश आम्हाला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले आहेत असे अबु आझमी यांनी सांगितले.
याप्रसंगी सर्वश्री प्रा.जोगेंद्र कवाडे, राजेश टोपे, नवाब मलिक, कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली. चर्चेत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंह, मधुकरराव चव्हाण, बस्वराज पाटील, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, नसिम खान, हर्षवर्धन पाटील यांनी भाग घेतला, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी आमदार सर्वश्री राम हरी रुपनवर, नितेश राणे, आनंदराव पाटील, सुरेश शेट्टी, सुधीर तांबे, सतिश चव्हाण, त्र्यंबक भिसे, सुभाष पाटील, मधुकर चव्हाण, अनंत गाडगीळ, संजय दत्त, दिलीपराव देशमुख, वैभव पिचड, किरण पावसकर, दत्तात्रय भरणे, संदिप नाईक, के.सी.पाडवी, सुनिल केदार, हरीभाऊ राठोड, कुणाल पाटील, विक्रम काळे, अनिल देशमुख, बंटी पाटील, अमरिश पटेल, श्रीमती अमिता चव्हाण, वजाहत मिर्झा, प्रणिती शिंदे, जयप्रकाश छाजेड, दिपक चव्हाण, मोहन जोशी, जयंत पाटील, बस्वराज पाटील, जितेंद्र आव्हाड, आसिफ शेख, विनायकराव पाटील, रमेश किर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, जि.प.सदस्य धिरज देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष् ॲङ व्यंकट बेद्रे, रेणा साखरचे चेअरमन आबासाहेब पाटील, रेणाचे व्हा. चेअरमन सर्जेराव मोरे, जि.प.सदस्य धनंजय देशमुख, एन.आर.पाटील, विक्रम हिप्परकर, मांजरा साखरचे व्हा. चेअरमन श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस.आर. देशमुख,बाजार समिती सभापती ललीतभाई शहा, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष् मोईज शेख, समद पटेल, नरेंद्र अग्रवाल, विलास साखरचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, सत्यजित देशमुख, पी. एन. पाटील, गुलाबराव घोरपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment