लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी विक्रमी 92 टक्के मतदान !

Sunday, December 9, 2018


संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेल्या लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी विक्रमी 92 टक्के मतदान झाले. नांदेड-सोमवारी सकाळी मतमोजनी होणार आहे. लोहा नगराध्यक्षपदासाठी चारजन तर नगरसेवक पदाच्या सतरा जागासाठी सत्तावन उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीत भाजप व काँगे्रसमध्ये काटे की टक्कर आहे. प्रचार्‍याच्या अंतिम टप्प्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जाहीरसभांनी कार्यकत्यार्ंमध्ये उत्साह आनला होता. शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर अनेक भागातील मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ झाले. ज्याप्रभागात चुरशीची लढत आहे तेथे दरही चांगलेच वधारले होते.
आज सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली. कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने शहराला छावणीचे रुप आले होते. अनेक वरिष्ठ अधिकारी लोह्यात तळ ठोकून होते. विक्रमी मतदान झाल्यानंतर काँग्रेस व भाजपच्या नेत्यांनी नगराध्यक्षसह बहुमताचा दावा केला. या निवडणुकीत आ. प्रताप पाटील चिखलीकर व आ. अमर राजूरकर यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली होती. उद्या सकाळी 8 मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. 11 वाजेपचर्यंत सर्व निकाल जाहीर होतील.

No comments:

Post a Comment