Sunday, December 9, 2018December 09, 2018
नवी दिल्ली, 9 : महाराष्ट्राला मिळालेल्या यजमान पदाचे सोने करू या; सगळया खेळाडूंचे स्वागत करू या. अशा शब्दात 9 जानेवारी 2019 पासून सुरू होणा-या ‘खेलो इंडिया-2019’ शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमान पद महाराष्ट्राला घोषित झाल्यानंतर क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ही प्रतिक्रिया आज येथे दिली. येथील ताज हॉटेलमध्ये ‘खेलो इंडिया’ 2019 च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला खेलो इंडियाचे यजमान पद मिळाल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमात केंद्रिय युवा व क्रीडा राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन राठोड, महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री तावडे, व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खेलो इंडिया -2019 हा कार्यक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण, केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि स्पोर्टस इंडिया यांच्या संयुक्त विद्यामाने पुण्यात आयोजित होणार आहे.
2019 च्या ‘खेलो इंडिया’चे यजमान पद महाराष्ट्राला !

By Marathwada Neta
Sunday, December 9, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment