लातूर: लोकसभा निवडणुकीचे सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभांसाठी मतदान पार पडले .मंगळवारी निकाल जाहीर होतील .मतदान झाल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले .निकालांचे अंदाज या वाहिन्यांनी वर्तवले.कोणी भाजपा आता संपली असे सांगितले तर काहीनी काट्याची टक्कर होणार असल्याचे मत वर्तवले .
असेच अंदाज आपणही वर्तवतो. अनेकदा वृत्तवाहिन्यांचे अंदाज चुकीचे ठरतात पण आपले अंदाज अगदी तंतोतंत खरे ठरतात. पण आपण वर्तवलेला अंदाज आपल्या जवळच राहतो. फार तर आपण मित्रांना तो सांगतो. आपले जे राजकीय निरीक्षण आहे त्याला प्रसिद्धी मिळत नाही .पण आता आम्ही आपल्या सोबत आहोत. आपण राजकीय अंदाज किंवा निवडणूक निकालांचा अंदाज आम्हाला सांगा .आम्ही त्याला प्रसिद्धी देऊ .एवढेच नव्हे तर ज्या वाचकांचे अंदाज तंतोतंत बरोबर ठरतील त्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्याचा निर्णय दैनिक मराठवाडा नेता ने घेतला आहे .
मराठवाड्यात आपण जेथे कोठे राहत असाल तेथे येऊन आपला सत्कार केला जाईल. एक आकर्षक भेटवस्तू आणि मोबाइल साठी एक महिन्याचे इंटरनेट पॅक असे बक्षिसाचे स्वरूप आहे .बरोबर अंदाज वर्तवणाऱ्या पहिल्या दहा जणांना हे बक्षीस दिले जाणार आहे .इतर निवडक वाचकांचे छायाचित्र आम्ही दैनिक मराठवाडा नेता मध्ये प्रकाशित करू.
तर मग चला ,कामाला लागा आणि आपले राजकीय कौशल्य वापरून मध्य प्रदेश, राजस्थान ,तेलंगणा ,छत्तीसग ड आणि मिझोरम या राज्यांच्या निवडणूक निकालांचे अंदाज आम्हाला पाठवा .उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 10 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या निवडणुक निकाला अंदाजांचा विचार केला जाईल. खाली दिलेला मेल आयडी आणि व्हॉट्सअप क्रमांकावर आपले अंदाज कळवा आणि बक्षिस मिळवा .
आपला
रामेश्वर बद्दर रेणापुरकर (संपादक )
7350819999
सत्यजीत बद्दर (कार्यकारी संपादक )
9333333548
No comments:
Post a Comment