मराठा आरक्षण पेटले पोलीस व्हॅन पेटविली

Tuesday, July 24, 2018

अग्नीशामक दलाच्या गाडीची तोडफोड
हिंगोली / प्रतिनिधी 
दुपारी बारा वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने कडकडीत बंद सुरू होता. पण त्यानंतर मात्र हे आरक्षण पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. 


हिंगोली तालुक्यातील खानापूर फाट्याजवळ हिंसक झालेल्या जमावाने पोलीसांनी पेटविल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मराठा आरक्षणाने उग्ररूप धारण केले असून या पेटविलेल्या पोलीस व्हॅनला विझविण्यासाठी जात असलेल्या अग्नीशामक दलाची गाडीवरही सावरखेडा गावाजवळ दगडफेक करण्यात आली. तसेच या राज्य रस्त्यावर झाडे तोडून टाकल्याने अग्नीशामक दलाच्या या गाडीला माघारी यावे लागले आहे. एकंदरीत जिल्हाभरात मराठा आरक्षणाचा भडका उडल्याचे चित्र पहावयास मिळत असून खानापूर फाट्याकडे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस व सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment