भाकपचा औंढा तहसील कार्यालयावर मोर्चा

Saturday, December 22, 2018


हिंगोली / प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सरकारने मात्र औंढा नागनाथ तालुक्याला वगळले. त्यामुळे शेतकर्‍यांत प्रचंड संताप व्यक्त होत असून, सरकारने औंढा तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर 21 डिसेंबर रोजी मोर्चा काढला.


औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रूपये अनुदान द्या, शेतकर्‍यांचे संपुर्ण कर्ज, विजबील माफ करा, रोजगार हमीची कामे जिल्ह्यात सुरू करा, वनाधिकारी कायद्याची अंमलबजावणी करा, गायरान जमिनी कसर्णाऐयांच्या नावे करा, शेतकरी, शेतमजूर यांना दरमहा 5 हजार रूपये पेन्शन लागू करा आदी या मोर्चातून शासनासमोर मांडण्यात आल्या. मोर्चा तहसील कार्यालयात आल्यानंतर तेथे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व कॉ.अंकूश बुधवंत यांनी केले. यावेळी सुरेश काचगुंडे, अजहर अली, शेषराव भालेराव, रूस्तुम राठोड, लष्कर पवार, किशनराव काशिदे, महादु दुमने, चांदु बोचरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, भाकपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment