भारता अनादिकालापासून श्री गजाननाची उपासना अव्याहतपणे चालू आहे. विशेषत: भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवास व गणपती उपासनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून, भाद्रपद महिन्यामध्ये वर्षा ऋतु चालु असतो. वर्षा ऋतुमध्ये शेतीच्या दृष्टीनेकोणतीही विघ्ने शेतकर्यांवर व भारतवर्षावर येवू नयेत यासाठी प्रामुख्याने विघ्नहर्त्या श्री गणेशाची उपासना भाद्रपद महिन्यात, किंबहुना वर्षाऋतूत संपूर्ण भारतात केली जाते. भाद्रपद महिन्यात गणेश उपासनेचे महत्त्व का आहे? याचे कारण, भाद्रपद महिना हा भद्रकृत्यांचा महिना म्हणून त्याचे नाव भाद्रपद. भद्रकृत्ये म्हणजे चांगली कृत्ये होय. चांगली कृत्ये ही चांगली बुद्धी निर्माण झाली तर होणार, म्हणून तशी चांगली बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी बुद्धिदात्या गजाननाची आराधना करावयाची. आराधना ही एकट्या माणसाने करण्यापेक्षा सर्वांनी मिळून केल्यास उपासनेचा परिणाम व प्रभाव जास्त प्रमाणात होतो व त्यातून विधायक शक्ती निर्माण होऊ शकते. एकदा विधायक शक्ती निर्माण झाली, की राष्ट्राचे रक्षण होण्यास मदत होते, या एकाच उद्देशाने लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली.
गणपती हा ३ गणांची अधिपती आहे, तसेच सत्व, रज, तम या ३ गुणांचाही अधिपती आहे. गणपतीला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात. तो विघ्नांचा, म्हणजेच संकटांचा नाश करतो, अशी अनेकांची श्रद्धा असते. गणपती विघ्नांचा नाश करतो याचा अर्थ आपण विघ्ने निर्माण करावयाची आणि गणपतीने ती दूर करावयाची असा नव्हे. विघ्ने (संकटे) का निर्माण होतात, याचा नीट विचार केल्यास असे लक्षात येते, की संकटे निर्माण होण्यास प्रमुख कारण म्हणजे योग्य त्या वेळी, योग्य निर्णय घेण्याची बुद्धीची क्षमता कमी पडणे हेच होय. गणेशाच्या उपासनेने मनाची एकाग्रता वाढून बुद्धीची निर्णय घेण्याची क्षमता वाढते, असा अनेक भक्तांना अनुभव आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मंगल प्रसंगी, तसेच प्राचीन ग्रंथांचेअवलोकन केल्यास कार्यारंभी, तसेच ग्रंथारंभी गणेशाचे पूजन व स्तवन करुन मगच पुढे त्या कार्याला व ग्रंथाला सुरुवात केल्याचे आपल्या लक्षात येईल, आदिकवी वाल्मीकींपासून ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा ग्रंथारंभी गणेश स्तवनाची परंपरा जोपासल्याचे आपल्या लक्षात येईल.
गणेशाची उपासना कोणी करावी?
श्री गणेशाच्या उपासनेस धर्म, जात, पंथ, स्त्री, पुरुष असे कोणतेही बंधन नाही. भक्तिभावाने व शासत्रोक्त पद्धतीने, तसेच पावित्र्य सांभाळून कोणीही गणेशाची उपासना करु शकतो. गणेशाची उपासना करण्यापूर्वी ‘उपासना’ शब्दाचा अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ‘उप’ म्हणजे जवळ व ‘आसन’ म्हणजे बसणे. थोडक्यात, ‘उपासना’ म्हणजे देवतेच्या जवळ बसणे. गणपतीच्या १० दिवसांच्या काळात मनानेजास्तीत जास्त गणेशाचे स्मरण, ध्यान, तसेच गणपतीच्या स्तोत्रांचे पठण करावे, त्यामुळे मन:शांती निश्चित लाभते, असा अनुभव आहे.
आता गणेशोत्सवात गणपतीच्या
पूजेसाठी शास्त्रोक्त मूर्ती कशी असावी याबद्दल :
पूर्वीच्या काळी स्वत:च्या शेतातील काळ्या मातीची किंवा चिकणमातीची पार्थिव गणेश मूर्ती स्वत:च्या हस्ते करुन त्या मूर्तीचे पुजन केले जाईल. परंतु कालौघात ही पद्धत बंद पडून विविध तैलरंगांनी रंगविलेल्या शाडूच्या गणेशमूर्तीचे पुजन सुरु झाले. सध्या शाडूच्या मूर्तीसोबत प्लॅस्टर ऑङ्ग पॅरिसच्या गणेशमूर्ती सुद्धा पहावयास मिळतात. प्रत्यकाच्या घरातील कुळाचाराप्रमाणे काही ठराविक दिवसच या पार्थिव गणेशमूर्तीचे पूजन केले जाते व त्यानंतर वाहत्या पाण्यात अथवा जलाशयात गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक असते. जलाशयात मूर्ती विसर्जन केल्यानंतर काही वेळातच त्या मूर्तीचे पाण्यात पूर्णपणे विसर्जन होणे आवश्यक असते. परंतु प्लॅस्टर ऑङ्ग पॅरिसच्या गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन केल्यानंतरही पूर्णपणे विरघळत नाहीत व त्यामुळे आपणच श्रद्धेने पूजा केलेल्या गणपतीच्या मूर्तीची निष्कारण विटंबना होते. हे सर्व टाळण्यासाठी शाडूच्या मूर्तीचीच स्थापना घरोघरी व गणेश मंडळांमध्ये व्हावी.
गणपतीची मूर्ती घरी आणतांना ती मूर्ती वाघ, उंदीर, हत्ती, मोर, गरुड इत्यादी प्राण्यांवर व पक्ष्यांवर बसलेली नसावी. गणेशमूर्ती कधीही उभी असलेली,नृत्य करणारी, एक पाय खाली सोडलेली, कोणत्याही राक्षसाचा वध करण्याच्या मुद्रेतील नसावी. केवळ हौसेखातर शास्त्राला ङ्गाटा देऊन ङ्गायर, प्लॅस्टिक, भंगलेल्या, प्लॅस्टर ऑङ्ग पॅरिस, विविध कडधान्यांचे गणपती अशा प्रकारच्या मूर्तीचे पुजन करु नये.
वास्तविक पाहता ज्या गणेशमूर्तीचे आपण पूजन करणार असतो, ती मूर्ती घेण्याबाबत दक्षता पाळणे जरुरीचे आहे. गणेशमूर्ती घरी आणताना ती एक वितीपेक्षा जास्त लांबीची असू नये. मूर्ती डाव्या सोंडेची, पद्मासन घातलेली, उजव्या हातात परशू, तर दुसरा हात ‘वर’ देणारा. एका डाव्या हातात पाशांकुश व दुसर्या हातात मोदक असावा.गणेशमूर्ती प्रसन्न चेहर्याची असणे आवश्यक आहे. गणेशमूर्ती आणावयास जातेवेळी आपल्याबरोबर ताम्हण व रुमाल घेऊन जावे. गणपती आणतांना झाकून आणावा व गणेशाचे तोंड आपल्याकडे करावे, गणपती आणतेवेळी गणपतीपुढे पावली (४ आणे) आणि गोविंद विडाठेवून गणपती घरी आणण्याची पद्धत आहे. गणपती घरी आणताना घराच्या दाराबाहेरच तांदूळ व पाणी ओवाळून ते बाहेर टाकून द्याव. नंतर गणपती आणणार्या व्यक्तीच्या पायावर गरम पाणी, दुध व पुन्हा गरम पाणी घालावे.गणपतीला व गणपती आणणार्या व्यक्तीला कुंकू लावून सुवासिींनी औक्षण करावे नंतर गणपती घरात आणून पाटावर तांदूळ पसरुन त्यावर ठेवावा.
गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना :
भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सुर्योदयानंतर, शक्यतो दुपारी १२ च्या पूर्वी शास्त्रोक्त पद्धतीने गणेशाची प्राणप्रतितष्ठा करुन, त्याचे षोडशोपचार अथवा पंचोपचार पूजन करावे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शक्यतो १० वर्षांच्या खालील लहान मुलाच्या हातून करावी. यचे कारण असे की प्राणप्रतिष्ठा करणार्या व्यक्तीच्या मनातील भाव व तरंग त्या मूर्तीत उतरत असतात. लहान मुले ही स्वभावत:च निर्विकार असतात. त्यामुळे तसेच शुद्ध भाव त्या मूर्तीत उतरतात व सात्विकता वाढण्यास मदत होते.
यंदा २९ ऑगस्ट २०१४, शुक्रवार या दिवशी गणेश चतुर्थी आहे. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना सूर्योदयानंतर दुपारी १.४८ पर्यंत केव्हाही करता येते. तरीसुद्धा विशेषत: मध्यान्ह काळात (सकाळी ११.१९ ते दुपारी १.४८) गणेशपूजन करावे, असे शास्त्र सांगते.]
एकदा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर विसर्जनाच्या दिवसापर्यंत मूर्ती हलवू नये. चुकून मूर्ती हालली गेल्यास परत प्राणप्रतिष्ठा करावी लागते. रोज मूर्तीचे पुजन करतांना ङ्गुलांनी पाणी, दूध मूर्तीवर शिंपडावे, अष्टगंध, शेंदूर, पत्री, केवडा, कमळ, दुवा, शमी, बुक्का, लाल वस्त्र, लाल ङ्गुले श्री गणेशास अर्पण करावीत. गणपती हे स्वत ‘मंगलमूर्ती’ असल्याने घरात मंगलमय वातावरण ठेवावे. घरात जास्तीत जास्त पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करावा. रोज गणपतीसमोर, गणेश अथर्वशीर्ष, संकटनाशन गणपती स्तोत्र, गणेशसहस्त्रनाम स्तोत्र, शंकराचार्यकृत गणेशपंचरत्न स्तोत्र यांसारख्या प्रासादिक स्तोत्रांचे पठण भक्तिभावाने करावे, हे शक्य न झाल्यास किमान ‘गं गणपतेय नम:’ या दिव्य मंत्राचा किमान १०८ जपत करावा.
चिंतामणीकल्प नावाच्या प्राचीन ग्रंथात सांगितल्याप्रमाणे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीस प्रत्येक तिथीनुसार खालीलप्रमाणे नैवेद्य दाखवावा. गणेश चतुर्थीस अनारसे, पंचमीस उडदाच्या डाळीचे वडे, षष्ठीस पुर्या, सप्तमीस घारगे, अष्टमीस पंचपक्वानांसह संपूर्ण जेवण, नवमीस-तांदळाची खीर (पायस), दशमीस - दुध, एकादशीस-पंचखाद्य, द्वादशीस-केळी, त्रयोदशीस-डाळिंब, अनंत चतुर्दशीस-जांभुळ. गणपतीस दुर्वा वाहतांना दुर्वांचे देठ कुंकवात बुडवून तिथिवृद्धीक्रमाने म्हणजे चतुर्थास चार, पंचमीस पाच, षष्ठीस सहा... चतुर्दशीस चौदा किवा रोज २१ अशा वाहाव्यात. गणेश चतुर्थीस धर्मशास्त्रानुसार चंद्रदर्शन वर्ज्य सांगितले. अनावधनाने चंद्रदर्शन घडल्यास पुढील श्लोकाचा १०८ वेळा जप करावा, ‘सिंह प्रसनेमवधीत्सिंहो जांबवता हत:| सुकुमारकमारोदीस्तव ह्येष स्यमंतक:॥
ज्या दिवशी गणपती विसर्जन असते, त्या दिवशी नेहमीप्रमाणे सोवळ्यात गणपतीची पुजा करावी. गणपतीच्या हातात तिळाचा लाडू व गुळखोबरे ठेवावे. आरती करुन झाल्यावर ‘पुनरागमनायच’किंवा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करुन गणपती मूळ जागेवरुन हलवावा, त्यानंतर मूर्ती ताम्हणात ठेवून गणपतीचे तोंडघराच्या दाराकडे करुन, गणपतीची पाठ आपल्याकडे करुन विहीरीत, तळ्यात, नदीत किंवा समुद्रात विसर्जन करावा. गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबत अनेक प्रकारचे गैरसमज समाजात प्रचलित आहेत. त्यातील एक म्हणजे घरात गर्भवती महिला असेल, तर स्त्री प्रसूत झाल्यानंतरच गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते. ही प्रथा पूर्णपणे अशास्त्रीय असून, यास कोणताही शास्त्राधार नाही. वास्तविक पाहता गर्भवती महिला व गणपती विसर्जन यांचा एकमेकांशी काडीमात्रही संबंध नाही. गणेशमूर्तीची स्थापना आपण ठराविक दिवसांपुरतीच केलेली असते व ठराविक दिवशीच त्या मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक असते. असे असतांना प्रसूती होईपर्यंत मूर्ती तशीच घरात ठेवणे पूर्णपणे अशास्त्रीय असून, यास कोणताही आधार नाही.
गणपती बसविल्यानंतर घरात सोयर अथवा सुतक आल्यास गुरुजींकडून अथवा सूतक नसलेल्या इतर नातेवाईकांकडून मूर्तीची रोजची पूजा व नैवेद्य करवावा. व्रतात खंड पडू देऊ नये.

No comments:
Post a Comment