आ.बसवराज पाटील यांच्या प्रयत्नाने औसा विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रीय पेयजयलमध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी 65 कोटी 68 लक्ष मंजूर

Tuesday, September 25, 2018


औसा / प्रतिनिधी 
औसा विधानसा मतदार संघातील औसा तालुक्यातील 36 गावे व निलंगा तालुक्यातील 12 गावाच्या पाणी पुरवठा योजना आ. बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय पेयजलमध्ये तब्बल 65 कोटी 68 लक्ष 75 हजार रूपये मंजूर केल्याची माहिती माहिती संपर्क कर्यालयातून देण्यात आली.

औंसा विधानसभा मतदार संघातील औसा व निलंगा तालुक्यातील राष्ट्रीय पेयजलमध्ये प्रत्येक गावनिहाय पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला होता. 30 खेडी किल्लारी 10 खेडी मातोळ 6 खेडी खरोसा अशा ज्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत. त्यचे वीज बिल पाणीपट्टी भरमसाठी वाढलेली आहे. ती भरण्यासाठी ग्रामपंचायत क डे पैसे नाहीत. या करिता शासनानेच या योजना चालू कराव्या. प्रत्येक गावची स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना मंजूरी द्यावी अशी वेळोवेळी मागणी अधिवेशनात शासनाकडे केली होती. 

त्यानुसार राज्यस्तरीय पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली. ती गावे मंजूर रकमा लक्षमध्ये खालील प्रमाणे आहेत. दावतापूर 69.45, नागरसोला 96.86, सारोळा 81.84, मागरगा 86.70, खरोसा 191.36, तावशीगड 85.25, कुमठा 59.19, सले 80.00, उजनी 750.00, हसलगन 92.00, जवळगा पो. 90.00, दापेगाव 45.00, बांगजी 65.00, गांजनखेडा 50.00, हिप्परगा क.75.00, किनीनवरे 95.00, लामजना 350.00, कार्ला 95.00, याकतपूर 72.00, किल्लारी 30 खेडी पाणी पुरवठा पुनर्जीवीत करणे 2000.00, तळणी 85.00, येळवट 75.0, माळकोडजी 62.00, कवळी 70.00, हारेगाव 80.00, लि.दाऊ 80.00, बानेगाव 81.00, सारणी 65.00, गुबाळ 85.00, लोहटा 35.00, उत्का 92.00, देवताळा 65.00, नांदुर्गा 100.00, माळुब्रा 50.00, भंगेवाडी 40.00, मातोळा 110.00, निलंगा तालुक्यातील चिंलवंतवाडी 65.45, जेवरी 102.62, पिरूपटेलवाडी 38.81, चांदोरी 45.00, कलमुगळी 62.65, हासुरी बु.65.90, हत्तरगा हा.51.54, शिंगनाळ 23.73, कासार शिरसी 250.00, पिंपळवाडी जेवरी 60.00, लिंबाळा 55.44, हणमंतवाडी हा 45.96 या गावातील योजनेचा समावेश आहे. कासारबालकुंदा 1 कोटी 31 लक्ष हे काम प्रगती पथावर आहे. या पाणी पुरवठ्याच्या राष्ट्रीय पेयजल मंजूर झालेल्या गावाचे उद्‌भव, पाईपलाईन करणे अंदाजपत्रके चालू आहेत. या योजना मंजूर झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment