लातूरच्या दोन तरुणांनी अभिमानास्पद कामगिरी करत सातासमुद्रापार भारताचा तिरंगा फडकाविला. सिंधीकामट (ता. देवणी) येथील दीपक कोनाळे या गिर्यारोकाने '३६० एक्सप्लोरर ग्रुप'द्वारे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केले, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील धावपटू ओमकार विवेकानंद स्वामी या तरुणाने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऑचस्नेर स्पोर्ट क्लबच्या वतीने ओमकार स्वामी यास 'स्टार ऑफ स्विस' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विश्वविक्रमी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, गिर्यारोहक बालाजी जाधव, निखिल यादव, सागर भारती यांनी स्थापन केलेल्या '३६० एक्सप्लोरर ग्रुप'द्वारे दीपक कोनाळे यांनी बुधवारी (दि.४) पहाटे किलिमंजारो शिखरावर भारताचा तिरंगा फडकावून विश्वविक्रम केला. आफ्रिकेतील या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावत त्यांनी भारताचे राष्ट्रगीत गायले.

साकोळ येथील उदयोन्मुख धावपटू ओमकार स्वामीची स्वित्झर्लंड येथे दि. ३ जुलै रोजी झालेल्या १०० किमी आंतरराष्ट्रीय अल्ट्रामॅरेथॉन जागतिक स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. या आंतरराष्ट्रीय अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेत केनियाचा धावपटू विल्सन किपसंगने ८ तास १० मिनिटांमध्ये १०० किमीचे अंतर पूर्ण करून प्रथम, केनियाचाच धावपटू डेनिस किमटो यांनी ८ तास ४० मिनिटांमध्ये १०० किमी पूर्ण करीत दुसरा क्रमांक पटकावला. तर भारताचा धावपटू ओमकार स्वामी याने ९ तास २ मिनिटांमध्ये १०० किमीचे आंतर पूर्ण करून तिसरा क्रमांक पटकावून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरले.
मराठवाडा लोकल ते ग्लोबल ब्रेकिंग न्यूज अपडेट्स देणार हक्काचे व्यासपीठ.
http://www.mnetaonline.com
राहा अपडेट कधीही,कुठेही वाचा बातम्या तुमच्या मोबाईलवर !
http://www.mnetaonline.com
राहा अपडेट कधीही,कुठेही वाचा बातम्या तुमच्या मोबाईलवर !

No comments:
Post a Comment