लातूर/प्रतिनिधी : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील मनमानी कारभाराच्या विरोधात भगवान रामचंद्र पाटील तळेगावकर व उदगीर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर 11 महिन्यापुर्वी सादर केेलेल्या चाचणी लेखा परीक्षण अहवालावर अद्यापही का कारवाई केली नाही याचा खुलासा करावा असे पत्र 21 ऑगस्ट रोजी सहकार आयुक्त पुणे यांनी लातूर येथील सहनिबंधकांना पाठवले आहे. या संदर्भात काय कारवाई केली ? 11 महिने झाले तरी उत्तर का दिले नाही याचा तात्काळ खुलासा करावा असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
भगवान पाटील तळेगावकर व नॉन करप्ट म्हणून परिचीत असलेले भरत चामले हे सातत्याने अन्यायाच्या विरोधात लढतात. हे प्रकरण त्यांनी अचलून धरले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बी.यु.भोसले-विशेष लेखा परिक्षक वर्ग-1 यांच्या विरोधात भारतीय दंड संहिते अन्वय कारवाई करण्यासाठी परवानगी मिळण्या बाबत पत्र पुणे कार्यालयास 9 फे ब्रुवारी 2017, 24 ऑगस्ट 2017 व 25 मे 2018 रोजी दिली. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर कार्यालयातील 18 जुलै 2017 च्या पत्राकडे लक्ष वेधत जिल्हा बॅंकेबाबत यु.एस.पवार, जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग-1 सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी आपल्या कार्यालयास सादर केलेल्या चाचणी लेखा परिक्षण अहवालावर काय कारवाई केली याचा अहवाल या कार्यालयास कळवावा यासंदर्भात आपणास पत्र पाठवून 11 महिने होवूनही अहवाल अद्याप प्राप्त नाही.
या सदंर्भात असे पत्र देण्यात आले आहे की, यु.एस. पवार जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग-1 उस्मानाबाद यांनी आपल्या कार्यालयास सादर केलेल्या चाचणी लेखा परिक्षण अहवालावर काय कारवाई केली याचा अहवाल कळवावा हे पत्र अप्पर आयुक्त सहकार यांच्या मान्यतेने पाठवण्यात आलेले आहे.
जिल्हा बॅंक ही शेतकरी कष्टकरी व श्रमिकांची बॅंक आहे. साधी कारवाई करण्यास 11 महिने लागतात ही बाब गंभीर आहे. लातूर येथील संबंधित अधिकारी प्रामाणिक म्हणून परिचित असताना या प्रकरणात टाळाटाळ का हे न उलघडणारे कोडे आहे. शासनाच्या सहकार विभागाला उलट टपाली सहनिबंधक काय माहिती देणार ? केंव्हा देणार याची उत्सुकता आहे. संबंधित अधिकारी हे संवेदनशील अधिकारी आहेत. ते तात्काळ कारवाई करतील अशी अपेक्षा भरत चामले यांनी व्यक्त केली.
जिल्हा बॅंकेच्या संदर्भात भरत चामले अभ्यासपुर्ण व कोणाच्याही दबावाखाली न येता पाठ पुरावा करत आहेत. अनेक पुरावे असताना या प्रकरणाचा छडा का लागत नाही हे समजत नाही. या प्रकरणी जिल्ह्यातील एक शिष्टमंडळ, पालकमंत्री, सहकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment