लातूर दि प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या एका माथेफिरु तरुणाने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करून काचा फोडल्या आपल्यावर अन्याय झाल्याचे नंतर त्याने पोलिसां ना सांगून दोन पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली .
सकाळी ७ .३० वाजण्याच्या सुमारास निलंगा तालुक्यातील सखाराम खुरपे याने कार्यालयावर दगड फेकले यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फुटल्या . सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकां नी ही बाब पोलिसां ना सांगितली पोलिसानी लगेच त्याला ताब्यात घेतले चौकशी केली आपल्यावर अन्याय झाला आहे पोलिसानी हा अन्याय केला असुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्याने केली एम आय डी सी पोलिस विविध बाजुं नी तपास करत आहेत .

No comments:
Post a Comment