शेतकरी दीन दलित्यांच्या घरापर्यंत पोहंचुन काम करणारे सरकार : अरविंद पाटील निलंगेकर

Tuesday, August 14, 2018

निलंगा प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबवित असुन त्या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोंहचविण्याचे काम प्रामाणिकपणे करत आसल्याचे प्रतिपादन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले 

निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथे प्रधानमंञी योजनेअंतर्गत उज्ज्वल गॅस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते व्यासपीठावर समाजकल्याण सभापती संजय दोरवे, तहशीलदार विक्रम देशमुख, पंचायत समितीचे सभापती अजीत माने, नायब तहसीलदार सौदागर तांदळे, उपसरपंच मधुकर माकणीकर, लक्ष्मीबाई बिराजदार अदी उपस्थित होते 

पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकांना गॅस देण्यासाठी उज्ज्वल योजना काढली त्यात आतापर्यंत देशात साडे तीन कोटी तर लातूर जिल्ह्यात ७२ हजार गॅस वाटप झाले आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही असा शब्द देत. गेल्या चार वर्षांपासून जवानाबरोबर दिवाळी साजरी करणारे मोदीजी पहीले पंतप्रधान आहेत. जलयुक्त व इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानामुळे गेल्या दोन वर्षांत एकाही गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही. सर्वात जास्त शोषखड्डे करणारा लातूर जिल्हा भारतात पहीला जिल्हा ठरला आहे. विकासाची चर्चा न करत २०१९ च्या मोदी लाटेच्या भीतीने विरोधक समाजामध्ये विश पेरण्याचे काम करत असल्याचा टोला लगावला. यावेळी तहशीलदार विक्रम देशमुख म्हणाले की महीना भरापुर्वी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी धुर मुक्त करण्याचा संकल्प केला होता त्या कामाची आज सुरुवात झाली असून येणाऱ्या वीस दिवसात गाव चुलमुक्त करण्याचा निर्धार बोलुन दाखवत रेशनकार्ड व रेशन देण्याची हमी घेतली 

यावेळी प्राथमिक आकरा गॅस व तीस रेशनकार्ड चे नागरिकांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौदागर तांदळे तर आभार राजु गायकवाड यांनी मांडले यावेळी सरपंच मनीषा श्रीमंगले, चेअरमन लक्ष्मण आकडे, तलाठी आर एस महाजन, मारुती गायकवाड, हणमंत सुर्यवंशी, दिगंबर पाटील, वामन येळीकर, बालाजी सूर्यवंशी, व्यंकट गायकवाड, शिवाजी आकडे, चंद्रशेन येळीकर, परमेश्वर सुर्यवंशी, माधव सुर्यवंशी अदी सह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment