दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदांज जसप्रीत बुमराह यांनी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले. कोहली ८८४ गुणांसह फलंदाजांच्या, तर बुमराह ७९७ गुणांसह गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉपवर आहेत.
या क्रमांकावर आहे. दुसºया स्थानी अफगाणिस्तानच्या राशिद खाने याने ७८८ गुणांसह बाजी मारली. युजवेंद्र चहल पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो सध्या ११ व्या स्थानी आहे. भारतीय संघ टीम क्रमवारीत १२२ गुणांसह दुसºया स्थानी आहे. इंग्लंडने १२७ गुणांसह पहिले स्थान राखले आहे.
एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा ८४२ गुणांसह द्वितीय, तर शिखर धवन ८०२ गुणांसह पाचव्या स्थानी विराजमान आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान ७८८ गुणांसह द्वितीय आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव ७०० गुणांनी तिसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत प्रभाव टाकणारा युजवेंद्र चहल ११ व्या क्रमांकावर विराजमान आहे. इंग्लंडने १२७ गुणांनी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थानावर कब्जा मिळवला आहे.
इंग्लंड आणि भारत आगामी दिवसात अनुक्रमे श्रीलंका व वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहेत.या मालिकांमध्ये इंग्लंड पराभूत झाल्यास आणि भारत विजयी झाल्यास पहिल्या दोन स्थानांवरील संघांच्या क्रमवारीत बदल होऊ शकतो. २० ऑक्टोबरपासून बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या मालिकेत विजयी ठरल्यास बांगलादेशच्या खात्यात एक गुण जमा होईल..

No comments:
Post a Comment