सेंट जोंस : भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघातून तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेलला वगळण्यात आले आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण या मालिकेसाठी उपलब्ध नसू, असे गेलने निवड समितीला कळवले होते. त्यामुळे एकदिवसीय मालिकेसाठी निवड समितीने त्याच्या नावाचा विचार केला नाही. आगामी विश्वचषक लक्षात घेता निवड समितीने तीन नव्या चेहऱ्यांना या मालिकेत संधी दिली आहे..
भारत आणि बांगलादेश दौऱ्यासाठी गेल संघाकडून खेळणार नाही. मात्र, इंग्लंड दौरा आणि एकदिवसीय विश्वचषकासाठी तो उपलब्ध असेल, असे निवड समिती अध्यक्ष कर्टनी ब्राऊन यांनी सांगितले.चंदरपॉल हेमराज, अष्टपैलू फॅबियन एलेन आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांना एकदिवसीय संघातून पदार्पणाची संधी मिळेल. केरॉन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो आणि आंद्रे रसेल यांचे टी- २० संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे रसेल एकदिवसीय मालिका खेळू शकणार नाही, तर नवा खेळाडू अलजारी जोसेफची भारतात येण्याअगोदर फिटनेस टेस्ट घेण्यात येईल.
एकदिवसीय मालिकेअगोदर वेस्ट इंडीजचे सराव शिबीर ठेवण्यात आले आहे. ड्वेन ब्राव्हो आणि फिरकी गोलंदाज सुनील नरिन यांना एकदिवसीय आणि टी-२० संघातूनही डच्चू देण्यात आला आहे. जेसन होल्डर एकदिवसीय, तर कार्लोस ब्रेथवाईट टी-२० संघाचे नेतृत्व करेल. एकदिवसीय आणि टी- २० मालिका दिवस-रात्र खेळवण्यात येईल.
एकदिवसीय संघ :
जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियन एलेन, सुनील ॲम्ब्रीश, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिमरोन हेटमायर, शाइ होप, ॲलजारी जोसेफ, एविन लुईस, ॲशले नर्स, किमो पॉल, रोवमॅन पॉवेल, केमर रोच, मर्लन सॅमुएल्स, ओशाने थॉमस..
टी-२० संघ :
कार्लोस बे्रथवाईट (कर्णधार), फॅबियन एलेन, डॅरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर, एविन लुईस, ओबेड मॅकाय, ॲशलेनर्स, किमो पॉल, खारी पियरे, केरॉन पोलार्ड, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, शेरफाने रदरफोर्ड आणि ओशाने थॉमस..

No comments:
Post a Comment