Rafel Deal : सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला दिले हे आदेश

Wednesday, October 10, 2018

नवी दिल्ली 
राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेची संपूर्ण माहिती कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत. राफेल घोटाळ्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीत कोर्टानं केंद्राला सुचना केली. राफेल विमान खरेदीसाठी फ्रान्सच्या कंपनीसोबत झालेल्या करारासंबंधीची संपूर्ण माहिती सरकारने बंद लिफाफ्यात कोर्टात सादर करावी, असे निर्देश कोर्टानं आज दिले आहेत. मात्र त्यासाठी कोणतीही नोटीस जारी करण्यात आलेली नाही. पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

राफेल विमानांच्या किमतींवरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना केंद्र सरकारला कोणतीही नोटीस न बजावता माहिती मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान कराराच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सीलबंद लिफाफ्यातून आपल्यासमोर सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. 

दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीताराम या राफेल विमान खरेदीवरून देशात उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्या आपले फ्रान्स सरकारमधील समकक्ष फ्लोरेंस पार्ली यांच्याशी दोन्ही देशांमधील सामरिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत तसेच स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment