डिसेंबर २०१९ पर्यंत पहिल्या रेल्वे कोचची निर्मिती : पालकमंत्री निलंगेकर

Friday, October 12, 2018

लातूर दि 
सत्यजीत बद्दर अजय असोपा 
मागच्या अनेक वर्षांपासून मराठवाडा क्षेत्र रोजगारापासून मागे राहिला आहे लातूर येथे मराठवाडा रेल्वे बोगी हा पहिलाच शासनाचा प्रकल्प होत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे त्यातून मराठवावड्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल या शिवाय २५ डिसेंबर २०१९ पर्यंत येथून पहिला रेल्वे कोच बाहेर पडेल त्या प्रमाणे उद्दिष्ट देण्यात आले आहे अशी माहिती लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली 

लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्याचे प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते विधीवध पूजा करून करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अभिमन्यू पवार , खा सुनील गायकवाड आमदार विनायकराव पाटील, आ त्रंबक भिसे, आ सुधाकर भालेराव, आ विक्रम काळे , भाजप नेते रमेश अप्पा कराड ,गणेश हाके , महापौर सुरेश पवार , जि प उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके , नागनाथ निडवदे , यांच्यासह नागरिक उपस्थित होते . 

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर या शुभ कार्याचा प्रारंभ होत आहे त्या मुळे आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे नमूद करून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले रेल्वे च्या इतिहासात एवढ्या कमी कालावधीत कोणत्याही प्रकल्पाची सुरवात झालेली नाही रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा पाठपुरावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांर्गदर्शनाचा संगम झाल्यामुळे लातूरच्या रेल्वे बोगी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास आज सुरवात होत आहे .

रेल्वे बोगी प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्रित क्लस्टर युनिट उभारले जाणार आहे त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांनी ३ तारखेला विशेष बैठक बोलावली आहे सर्वांच्या सहकार्यातून हा प्रकल्प होत आहे अनेक अधिकाऱ्याची हि इच्छा लातूरला हा प्रकल्प व्हावा अशीच होती असे बोलून पालकमंत्री निलंगेकर म्हणाले कि लातूरचा रेल्वे बोगी प्रकल्प सीएम वोर रूम आणि रेल्वे मंत्र्यांचा की प्रोजेक्ट म्हणून दर १५ दिवसाला कामाचा आढावा घेतला जाणार आहे आई जगदंबेच्या कृपेने मराठवाड्यातील तरुणांना या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वाधिक रोजगार उपलब्ध व्हावेत अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी या वेळी केली

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर


No comments:

Post a Comment