लातूर, दि. 13 – लातूर तालुक्यातील जवळा(बु.)-रामेश्वर, लातूर-नांदेड या राज्य मार्गाला जोडणाऱ्या चिकलठाणा गावचा रस्ता व रेणापूर तालुक्यातील शेरा-पोहरेगाव रस्ता, रेणापूर-पानगाव या राज्य मार्गाला जोडणाऱ्या हणमंतवाडीचा रस्ता व मोरवड-चाडगाव या लातूर व रेणापूर तालुक्यतील विविध गावांना जोडणाऱ्या 19 कि.मी. 24 मी. रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 10 कोटी 48 लक्ष, 78 हजार रुपये निधी मंजुर झाला असून राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने दि. 10 ऑक्टोबर 2018 रोजी तसा शासन निर्णय काढुन रस्ते सुधारणा कामास मान्यता दिली आहे. लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावच्या रस्त्यांच्या कामास मंजुरी मिळाल्याने या भागातील नागरीकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पुर्णत्वास येत असून या कामासाठी लातूर ग्रामीणचे भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी वेळो-वेळी पाठपुरावा केल्याबद्दल विविध गावच्या नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
लातूर तालुक्यातील लातूर-कळंब 236 या राज्य मार्गाला जोडला जाणाऱ्या जवळा (बु.)-रामेश्वर या सहा कि. मी. रस्त्यासाठी 3 कोटी 86 लक्ष 95 हजार रुपये, लातूर-नांदेड 248 या राज्य मार्गाला जोडणाऱ्या चिकलठाणा या गावच्या दिड कि. मी. रस्त्यासाठी 79 लक्ष 24 हजार रुपये तर रेणापूर तालुक्यातील लातूर-अंबाजोगाई या राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणाऱ्या कुंभारी फाटा ते शेरा-पोहरेगाव या 5 कि.मी. 300 मी. लांबीच्या रस्त्यासाठी 2 कोटी 49 लक्ष 83 हजार रुपये, रेणापूर-पानगाव 233 या राज्य मार्गाला जोडणाऱ्या हणमंतवाडी गावच्या एक कि. मी. 100 मी. रस्त्यासाठी 58 लक्ष 73 हजार रुपये व मोरवड प्रजिमा–3 चाडगाव या 5 कि. मी. 34 मी. जिल्हा सरहद्द रस्त्यासाठी 2 कोटी, 74 लक्ष, 3 हजार रुपये अशा एकुन 19 कि. मी. 24 मी. रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 10 कोटी 48 लक्ष, 78 हजार रुपये एवढा निधी मंजुर करण्यात आला आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची काँग्रेसच्या कार्यकाळात मतदार संघातील लोकप्रतिनीधीच्या उदाशिनतेमुळे पुर्णता दुर्दशा झालेली होती. निकृष्ट रस्त्यामुळे लोकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत असून त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर सदरील रस्त्याचे काम व्हावे, याकरीता लातूर ग्रामीणचे भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सहकार्याने राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडे वेळो-वेळी पाठपुरावा केला असता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावांना जोडणाऱ्या 19 कि.मी. 24 मी. रस्त्यांच्या कामास मंजुरी मिळाली असून या रस्त्यांच्या कामावर जवळपास 10 कोटी 48 लक्ष, 78 हजार रुपये निधी खर्ची होणार असून अनेक गावांचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
विविध गावच्या रस्त्यांच्या कामासबंधी शासनस्तरावरील सर्व ती कार्यवाही जवळपास पुर्ण होत आली असून ग्राम विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत सदरील कामास लवकरच प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे, पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे तसेच या कामी लातूर ग्रामीणचे भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी वेळो-वेळी पाठपुरावा केला त्याबद्दल या सर्वांचे रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, रेणापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष अभिषेक अकनगीरे, रेणापूर पंचायत समितीचे भाजपाचे गटनेते रमेश सोनवणे, भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष ॲङ दशरथ सरवदे, भाजपा युवा मोर्चाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पाटील, भाजपाचे रेणापूर तालुका सरचिटणीस श्रीकृष्ण मोटेगावकर, रेणापूर नगरपंचायतचे बांधकाम सभापती विजय चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती सौ. सुमन श्रीकृष्ण मोटेगावकर, हणमंतवाडीचे विक्रम भातीकरे, बाबुराव गुणाले, अरुण आलापुरे, आंगद शेंडगे, धोंडीराम गुणाले, केशव साळुंके, पिंटु गुणाले, मनोहर पाटील, रामेश्वरच्या सरपंच सौ. सुदामती कराड, उपसरपंच कमाल पटेल, सुधाकर कराड, हणमंत गजधने, भरत कराड, मोरवडचे उध्दव घोडके, ज्ञानोबा घोडके, किशन क्षीरसागर व चाडगावचे नवनाथ माने, महादेव माने, अमर माने आदीसह विविध गावच्या ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment