नायगाव/ प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील नायगाव, नरसी, कुंटूरफाटा , कहाळा, कृष्णुर, गडगा, राहेर, देगाव, खैरगाव, रातोळी, अल्लूवडगाव, सोमठाना, मांजरम, होटाळा, धुप्पा व बरबडाफाटा येथे शांततेत रस्तारोको व कडकडीत बंद पाळला.वरील सर्वच ठिकाणी नायगाव तहसील व पोलिस ठाण्यासह रामतीर्थ व कुंटूर पोलिस ठाण्याचे आधिकारी कर्मचारी घटनास्थळी बंदोबस्तासाठी सज्ज होते.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नायगाव तालुक्यातील कुंटूरफाटा येथे आज गुरूवार दिनांक 9 रोजी रात्री साडे बारा वाजता पासूनच मराठा समाजाच्या देगाव, हिप्परगा जानेराव, रानसुगाव, अंचोली, गंगणबिड येथील कार्यकर्त्यांनी, साईनाथ मोरे, सतीश कदम, गजानन कदम यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला रात्रभर कुंटूरफाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक थांबुन होती. सकाळी 6 वाजता नायब तहसीलदार नवनाथ वगवाड व कुंटूर पोलिस ठाण्याचे पोलिस सपोनि शरद मरे यांनी अंदोलन कर्त्यांची भेट घेवून अंदोलन शांततेत करण्याचे अवहान केले. या ठिकाणी रवी मोरे, निलकंठ मोरे, भास्कर मोरे, बंदी मोरे, पंडीत मोरे,संतोष मोरे, राजेश कदम, मारोती कदम, सदिप कदम, सचिन मोरे,बंडू मोरे, साईनाथ कळकेकर, हानमंत जाधव, ज्ञानेश्वर जाधव, बंडू जाधव, संतोष कदम आदि प्रमुख अंदोलक रस्त्यावर उतरले होते.
नायगावच्या हेडगेवार चौकात युवानेते रविंद्र चव्हाण, नगरपंचायतचे उपाध्यक्ष विजय चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, यादवराव शिंदे, दत्ता इज्जतगावकर, बाबासाहेब हंबर्डे,माधव चव्हाण, माणिक चव्हाण, जिवन चव्हाण, रंजीत देसाई, भगवान कदम खंडगाव, शंकर लाब्दे, पांडुरंग चव्हाण, हानमंत शिंदे, शरद हंबर्डे, शिवराज नकाते, आत्माराम हंबर्डे, सुमीत कल्याण, रंजीत कल्याण, आदिसह अनेक गावातील मराठा कार्यकर्ते नायगावच्या हेडगेवार चौकात जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करून सरकार वर रोष व्यक्त केला.
नरसी येथील रस्तारोकोत भगवाणराव भिलवंडे, दशरथराव भिलवंडे, निलकंठ ताटे,बालाजी ताटे, भगवान कोनोले,आनंदा मजरे, जयराम महाराज, संजय ताटे, विद्याधर ताटे, दिगांबर भिलवंडे, अनिल पवळे मांजरम येथे झालेल्या रास्तारोको व बंद अदोलनात रस्त्यावर शाहिरी व भजन करण्यात आले यावेळी शाहिर सुर्यकांत शिंदे, साहेबराव जाधव, संभाजी शिंदे, भास्कर गायकवाड, शिवाजी गायकवाड, मनोज शिंदे, शिवा गडगेकर, स्वप्निल जाधव, रावसाहेब पाटील, गजानन जाधव,विकास गडगेकर, ओम जाधव, साईनाथ जाधव. रातोळी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात संदिप पाटील, सुर्याजी पाटील, राहूल पाटील, सोपान पाटील, शिवराज पाटील, नंदू पाटील. राहेर येथे झालेल्या आंदोलनात भगवान हिवराळे, प्रकाश हिवराळे, शिवराज नरवाडे, प्रल्हाद इंगळे, सुरेश नरवाडे, पाटिल नरवाडे कहाळा येथील ब॔द व रस्तारोकोत प्रविण शिंदे, साईनाथ हेंडगे, गोविंद शिंदे, नागनाथ भारतळे, सुनिल लुंगारे, बालाजीराव धर्माधिकारी, पंडीत हंबर्डे, किशन शिंदे, धुप्पा शंकरनगर येथे संजय पाटील शेळगावकर, सुधाकर बावणे, सुभाष घाटोळे, यादवराव भेंलोंडे, पांडुरंग भेंलोंडे, सुधाकर भेंलोंडे, अनिल जांभळे तसेच कृष्णुर येथे आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यात अमोल नावंदे, विजय जाधव, परबतराव पाटील,पिटू जाधव व पंजाबराव पाटील यांचा समावेश होता.
नायगाव तालुक्यात शांततेत अंदोलन व्हावे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसीलदार नवनाथ वगवाड, नंदकिशोर भोसीकर, पोलिस निरिक्षक गणेश सोंडारे, सपोनि अशोक जाधव, शरद मरे, दिलिप इंगळे, उपनिरीक्षक अजित बिरादार, शिवराज थडके.
No comments:
Post a Comment