अल्ला तुम्हारा भला करेगा,हज यात्रेकरूंची दुआ

Thursday, August 9, 2018


.

हिंगोली/प्रतिनिधी
आंदोलनादरम्यान, जिल्हाभरात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे कापून टाकण्यात आली होती. यामुळे सर्वत्र चक्काजाम झाला होता. पण मराठा बांधवांनी तातडीची सेवा म्हणून जिल्हाभरात अनेक रूग्णवाहिकांना वाट मोकळी करून दिली. तर हिंगोली जिल्ह्यातील काही मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी परभणी, अकोला मार्गे आपल्या चारचाकी वाहनाने रेल्वे स्थानकावर जात असताना या हज यात्रेकरूंनाही रस्ता मोकळा करून दिल्याने रूग्णांना व हज यात्रेकरूंना मराठा आंदोलकांच्या माणुसकीची प्रचिती आली. या यात्रेकरूंनी अल्ला तुम्हारा भला करेगा अशी दुआही आंदोलकांना दिली. एवढ्या तणावाच्या परिस्थितीतही आंदोलकांनी जोपासलेल्या धार्मिक एकोप्याचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment