तुम्ही आमच्या लेकी, महिला पोलीसांना साडी चोळी

Thursday, August 9, 2018


हिंगोली/ प्रतिनिधी

आज जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला हेाता. या बंदोबस्त कामी अनेक महिलां कर्मचाऱ्यांनाचाही समावेश होता. औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांविषयी महिला आंदोलकांनी मायेची उब दाखवली. तुम्ही आमच्या लेकी आहात असे म्हणत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना साडी-चोळी देवून त्यांचा सन्मान केेला. कर्तव्यावर असताना मराठा रणरागिनींकडून मिळालेल्या या सन्मानामुळे महिला कर्मचारीही भावूक झाल्या होत्या. या उपक्रमाची दिवसभर कौतुकाने चर्चा होताना पहावयास मिळाली.

No comments:

Post a Comment