कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील घटना
आखाडा बाळापूर / प्रतिनिधी
कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे शेततळ्यात बुडून माय-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी दुपारी दिडच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे सिंदगी गावावर शोककळा पसरली आहे.
प्रभाकर विठ्ठलराव मगर व त्यांची आई विजयमाला विठ्ठलराव मगर वय 45 वर्ष हे दोघे माय-लेक सिंदगी शिवारातील आपल्या शेतात कामासाठी गेले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर त्यांच्या शेताजवळील एका शेततळ्यात पाणी पिण्यासाठी प्रभाकर मगर वय 22 गेला होता. त्यावेळी मगर यांचा पाय घसरू न ते या तळ्यात बुडत होते. हे दृष्य त्यांच्या आई विजयमाला यांनी पाहिल्यानंतर पोटच्या पोराला वाचविण्यासाठी त्यांनीही तळ्याकडे धाव घेतली. मुलाला वाचविण्याच्या नादात आईलाही आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती पोलीस प्रशासनाला कळाल्यानंतर दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. माय-लेकाच्या या मृत्यूमुळे गावावर शोक कळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment